अकोले तालुक्यातील खिरविरे येथे चोरांचा धुमाकुळ
पिंपळगाव नाकविंदा/प्रतिनिधी: अकोले तालुक्यातील खिरविरे येथे मध्यरात्रीच्या सुमारास चोरांनी चांगलाच धुमाकुळ घातला आहे. येथील जैन मंदिर, विठ्ठल रुख्मीनी मंदिर, मारूती मंदिर तसेच भैरवनाथाचे मंदिर फोडून मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील रक्कम तसेच मृर्तीवरील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली. तसेच आरनॉल्ड अल्वेस यांच्या फार्म हाऊसचे कुलूप तोडून आत मधील कपाट फोडून त्यातील कपडे, रोख रक्कम चोरून नेली आहे तसेच संसार उपयोगी वस्तुंचे नुकसान केले आहे.
तसेच याठिकाणी लावण्यात आलेले सिसिटिव्ही काढून शेजारीच शेततळयात टाकण्यात आले होते. असे एकूण दिड ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यानंतर ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर चोरांनी तेथुन पोबारा केला. ग्रामस्थांनी दिलेल्या माहीतीनुसार पोलीस उपनिरिक्षक दिपक ढोमणे यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला आहे.
यापुर्वी देखील याच गावात वापरते कपडे तसेच चप्पल चोरीच्या घटना घडल्या आहे.या घटनांमुळे परीसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे सामाजीक कार्यकर्ते दिनेश शहा, काळु बेणके, पोलीस पाटील हिरामण बेणके, माजी सरपंच गणपत डगळे, माजी उपसरपंच सुभाष बेणके, निवृत्ती पराड, प्रकाश पराड,रामजी रावते, देवराम हाळकुंडे, शाम बेणके, प्रविण पराड, भिमराव बेणके, दत्तु बेणके, संदिप बेणके, दिलीप आवारी, जयराम डगळे यांसह ग्रामस्थांनी आरोपींचा शोध घेऊन कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली आहे.
Website Title: Latest News theft at Khirvire