राज्यात करवाढीवर महसूलमंत्री थोरात म्हणतात…
अहमदनगर: करोना प्रतिबंधासाठी जारी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे देशासह राज्याचे अर्थचक्र कोलमडले आहे. औद्योगिकदृष्ट्या संपन्न असलेल्या महाराष्ट्राला अधिक फटका बसला आहे. राज्याचे उत्पन्न घटले असले तरी आपण अद्याप कर वाढविण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही.
कारोनाचा प्रसार रोखण्याबरोबरच राज्याच्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठीसुद्धा निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यादृष्टीने मंत्रीमंडळात चर्चा सुरु असल्याचे प्रतिपादन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
महसूलमंत्री थोरात यांनी नगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करोना परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. थोरात म्हणाले लॉकडाऊन जरी शिथिल केला असला तरी परिस्थिती लगेच बदलणार नाही. हळूहळू व्यापार उद्योग सुरु होऊ लागले आहेत. मुद्रांक विक्री सुरु झाली आहे. त्यामुळे महसूल उत्पन्न थोड्या प्रमाणात सुरु झाले आहे. राज्याचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घटले आहे.मात्र सध्याच्या परिस्थिती नागरिकांचा जीव वाचविणे महत्वाचे आहे. उत्पन्न वाढीसाठी करवाढ करण्याबाबत कोणताही विचार नाही.
Website Title: Latest News Tax increment thorat says