खिरविरे: दिल्ली येथे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सर्वोदयच्या गणेश बेनके ची निवड
खिरविरे: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय शालेय कुस्ती स्पर्धा नुकत्याच आळंदी जि.पुणे येथे पार पडल्या.या स्पर्धेमध्ये सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथील १७ वर्षाखालील मुले ९२ किलो वजनगटात फ्रीस्टाइल कुस्ती प्रकारात गणेश बेनके याने प्रथम क्रमांक संपादन करून त्यांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली. या विद्यार्थ्याला महाराष्ट्र चाम्पियन,अकोले मधील मार्गदर्शक राहुल शिंदे यांनी मार्गदर्शन केले.
या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष मनोहर देशमुख, सचिव टी. एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, कोषाध्यक्ष विवेक मदन, संचालक प्रकाश टाकळकर व सर्व संचालक मंडळ तसेच विद्यालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत, संपत धुमाळ, प्रा. सचिन लगड, प्रा.अजित गुंजाळ यांनी अभिनंदन केले. व दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Website Title: Latest News Svm Khirvire National Level Wrestling