अकोले तालुक्यातील घटना: मुलाने केला पित्याचा खून
अकोले: तालुक्यातील बोरी येथील कांबळेवाडीत आपल्या स्वतःच्या ७० वर्षीय पित्यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत रक्तबंबाळ करून खून केल्याची घटना घडली आहे. या मयत वृद्धाचे नाव भागवत गोमा कांबळे आहे तर त्याचा मुलगा आरोपी राजेंद्र भागवत कांबळे वय ४४ यास पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अकोले पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,पित्याने मुलाला दारू का पितो अशी विचारणा केल्याचा राग आल्याने पित्यास मुलाने मारहाण करण्यास सुरुवात केली. पिता तेथून निघून जात असतानाही त्यास घराकडे आणून जबर मारहाण केल्याने तो रक्तबंबाळ त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी ३.१५ वाजेच्या सुमारास घडली. आरोपीची बायकोही १५ दिवसांपासून मारहाणीला व त्रासाला कंटाळून निघून गेली आहे.
वाचा: संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर अपघात एक ठार
याबाबत अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. मृताची नात निकिता राजेंद्र साबळे हिने याबाबत तक्रार दिली असून अकोले पोलिसांनी राजेंद्र कांबळे ह्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास अकोले पोलीस करीत आहे.
Website Title: Latest News son murdered the father in Akole Taluka