डोंगरगाव ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम तपासणी दौरा
डोंगरगाव (अशोक उगले): अकोले तालुक्यातील डोंगरगाव येथे स्मार्ट ग्राम कमिटीची पाहणी दिनांक १५ जानेवारी २०२० रोजी ग्रामपंचायत डोंगरगाव ग्रामपंचायतीची स्मार्ट ग्राम तपासणी सन अठरा-एकोणीस वर आधारित माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती कोपरगाव गटविकास अधिकारी सोनकुसळे, शाखा अभियंता आर टी दिघे, विस्तार अधिकारी भांगे, विस्तार अधिकारी वाकचौरे, विस्तार अधिकारी एस जी माळी, विस्तार अधिकारी डी ओ रानमळ, विस्तार अधिकारी के डी सरोदे, कुळधरन हे सर्व अधिकारी वर्ग यांनी डोंगरगाव गावी येऊन सखोल तपासणी केली.
वाचा: अकोले तालुक्यातील खिरविरे येथे चोरांचा धुमाकुळ
यामध्ये आय एस ओ शाळा, डिजिटल अंगणवाडी, माध्यमिक विद्यालय, अद्यावत स्मशानभूमी, तीर्थक्षेत्र विकास मंदिर, सुसज्ज ग्रामपंचायत कार्यालय, अंतर्गत रस्ते, रान माळ पॅटर्न वृक्ष लागवड, फळबागा सांडपाण्याचा पुनर्वापर त्याद्वारे फळबाग निर्मिती, बंदिस्त गटारे, घनकचरा व्यवस्थापन, ओला कचरा, सुका कचरा विल्हेवाट नियोजन, दलित वस्ती पाहणी, लसीकरण, बाजारतळ सुशोभीकरण, ग्रामपंचायतीचे उत्पन्नाची साधने, पिण्याचे पाणी शुद्धीकरण आरो प्लांट नाविन्यपूर्ण उपक्रम त्यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत वेबसाईट, फेसबुक पेज, सांडपाण्याचा पुनर्वापर, ग्रामपंचायत मालकी जागेत ठिबक सिंचनाद्वारे वृक्ष लागवड, स्मशानभूमी सुशोबिकरण, व जिल्हा परिषद शाळेत बसवण्यात आलेले एल ई डी, कॉम्पुटर त्याचा वापर मुलांना प्रशिक्षण, आपले सरकार सेवा केंद्र अंतर्गत दिल्या जाणाऱ्या ऑनलाईन सेवा सुविधा १ते ३३ ऑनलाईन रजिस्टर हार्ड कॉपी तपासणी, तसेच शाळेतील गळतीचे प्रमाण झिरो टक्के, जनधन योजना, बचत गट त्याची तपासणी, अटल पेन्शन योजना, एलईडी दिव्यांचा वापर सौरदिवे, बायोगॅस, आधुनिक मुक्त संचार गोठे वनराई बंधारे, लोकसहभागातून जलसंधारणाची कामे ,शैक्षणिक शाळेची माध्यमिक शाळेची उपलब्धी, जनतेबरोबर संवाद आदी बाबींवर संपूर्ण गावात चार तास सखोल तपासणी पहाणी निरीक्षण क्रिया-प्रतिक्रिया जनतेबरोबर सुसंवाद, फोटोग्राफ्स या बाबीवर कमिटीने भर देऊन स्वतः समक्ष पाहणी केली.
डोंगरगाव गाव याठिकाणी सरपंच बाबासाहेब उगले,ग्रामसेवक बजरंग चौधरी, माजी उपसरपंच तथा सदस्य अशोक उगले, उपसरपंच देवराम आगविले, ग्रामपंचायत सदस्य संतोष कदम, आर के उगले, संतोष सरोदे, भारती उगले,संगिता उगले, कविता उगले, योगिता उगले, अनिता मेंगाळ, अश्विनी उगले, ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब उगले, डाटा ऑपरेटर सुनील कदम, लखन माळी, संजय शिरसागर,संजय कदम पाणी पुरवठा कर्मचारी ज्ञानेश्वर उगले,यांनी सहयोग देऊन या कामी सहकार्य केले.
वाचा: संगमनेरमध्ये संजय राउत यांच्या पुतळ्याला जोडे मारण्याचे आंदोलन
ग्रामस्थांच्यावतीने कमिटीचे भव्य स्वागत करण्यात आले त्यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले. नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक केले ग्रामपंचायत चे सर्व कामकाज सरपंच बाबासाहेब उगले, बजरंग चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या सर्व कामकाजाची पुस्तिका विविध प्रकारचे दाखले उतारे आणि पावर प्रेसेंटेशन सादरीकरण याठिकाणी दाखवण्यात आले त्यांना हर्डकॉपी स्वरूपात पुस्तिका विविध दाखले ,खाते उतारे, सादर करण्यात आले निश्चितपणे केलेल्या कामाचे मूल्यमापन सकारात्मक होईल असा आत्मविश्वास , ग्रामसेवक,सरपंच, उपसरपंच,सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ यांनी व्यक्त केला.
Website Title: Latest News Smart Village Inspection Tour of Dongargaon