अकोले: मारुतीराव कोते पब्लिक स्कुलने पटकाविला स्मृतिचषक
राजूर: सत्यानिकेतन संस्थेने आयोजित केलेल्या रा.वि. पाटणकर आंतरविद्यालयीन वकृत्व स्पर्धेचा मोठ्या गटाचा स्मृतिचषक अकोले येथील मारुतीराव कोते पब्लिक स्कुलने तर लहान गटात अकोले तालुक्यातील गर्दणी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेने पटकाविला.
अकोले तालुक्यातील विविध विद्यालयातील ७० स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता. यात पाचवी ते सातवी लहान गटात गर्दनी जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्या शरद मंडलिक हिने प्रथम क्रमांक पटकविला. राजूर येथील पाटणकर सर्वोदय विद्यालयातील आर्या श्रीकांत घाणे हिने द्वितीय, वाशेरे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील ओम नंदकुमार गजे याने तृतीय क्रमांक मिळविला. कन्या विद्यालयाची प्रांजली प्रवीण धुमाळ व कोतूळ येथील सावित्रीबाई फुले विद्यालयाची तनुजा रवींद्र आरोटे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली.
मोठ्या गटात अकोले येथील मारुतीराव कोते पब्लिक स्कुलचा कपिल मच्चीन्द्र देशमुख याने प्रथम क्रमांक पटकविला. अकोले कन्या विद्यालयाची अपूर्वा बाळासाहेब फाफाळे द्वितीय तर सत्याजा कैलास सोनवणे तृतीय क्रमांक मिळविला. मेहंदुरी येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयाची कल्याणी विकास हासे आणि खिरविरे येथील सर्वोदय विद्यालयाची ऋतुजा सुनील डगळे यांनी उत्तेजनार्थ बक्षिसे मिळविली.
महावितरणचे सहायक अभियंता राहुल कुटे, बायफचे नाशिक विभागीय अधिकारी जत्तीन साठे, संस्थेचे सचिव टी. एन. कानवडे , सहसचिव मिलिंद उमराणी यांच्या हस्ते पारितोषिक वितरीत करण्यात आले. संचालक अशोक मंडलिक, प्राचार्य मनोहर लेंडे, पर्यवेक्षक शिवाजी नरसाळे, प्रकाश महाले, अजित गुंजाळ यावेळी उपस्थित होते. परीक्षक म्हणून भाऊसाहेब कासार, नरेंद्र राठोड, राजेंद्र भाग्यवंत आणि दीपक बोऱ्हाडे यांनी काम पहिले. स्पर्धा प्रमुख जी. एल. शिंदे, दीपक पाचपुते यांनी समन्वयक म्हणून काम केले. सूत्रसंचालन अध्यापक संतराम बारवकर यांनी केले. तर आभार जी.एल.शिंदे यांनी मानले. आर.पी. आढळ, पी.आर. मालुंजकर यांनी स्पर्धा यशस्वीतेसाठी काम पाहिले.
Website Title: Latest News Satyaniketan Sanstha sperm competition