सुगाव खुर्द च्या सरपंचपदी प्रज्ञा वैद्य यांची बिनविरोध निवड
अकोले (प्रतिनिधी): अकोले तालुक्यातील निर्मल ग्राम,पर्यावरण संतुलन व तंटामुक्त गाव पुरस्कार प्राप्त सुगाव खुर्द च्या ग्रामपंचायत च्या सरपंचपदी सौ.प्रज्ञा प्रविण वैद्य यांची बिनविरोध निवड झाली.
सुगाव खुर्द ग्रामपंचायत च्या सरपंच पदाच्या निवडणूकीसाठी ग्रा. पं. कार्यालयाच्या सभागृहात आज गुरुवारी विशेष सभा बोलविण्यात आली होती.सरपंच निवडणूक सभेचे अध्यक्ष तथा अध्यासी अधिकारी म्हणून वीरगावचे मंडलाधिकारी एस व्ही सरवर यांनी काम पाहिले.याकामी त्यांना कोतुळ चे मंडलाधिकारी बी बी बगाड,कामगार तलाठी प्रमोद शिंदे,ग्रामसेवक सुनिल सोनार,लिपिक संजय वैद्य यांनी मदत केली.
सरपंच सौ.प्रज्ञा वैद्य यांचे नामनिर्देशन पत्रावर सूचक म्हणून विलास वैद्य यांची स्वाक्षरी आहे. सौ.प्रज्ञा वैद्य यांचे एकमेव नामनिर्देशन पत्र दाखल झाल्याने सरपंच पदासाठी त्यांची अविरोध निवड झाल्याची घोषणा सभेचे अध्यासी अधिकारी मंडलाधिकारी सरवर यांनी केली.
या सभेस मावळते सरपंच महेश वैद्य, उपसरपंच रंजना धराडे यांच्यासह ग्रा पं सदस्य विलास वैद्य,अमोल वैद्य, सौ.रंजना अरुण वैद्य,सौ.कल्पना राजाराम पवार हे उपस्थित होते.
बिनविरोध निवड झाल्याची घोषणा होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण केली.
यानंतर आयोजित सत्कार समारंभ प्रसंगी मावळते सरपंच महेश वैद्य, नूतन सरपंच प्रज्ञा वैद्य यांनी मनोगते व्यक्त केली. बिनविरोध निवडी बद्दल सौ.वैद्य यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ग्रा पं व सर्व संस्था यांचे आजी- माजी पदाधिकारी व सदस्य,ज्येष्ठ नागरिक यांना विश्वासात घेऊन ग्रा पं कारभार पारदर्शी व काटकसरीने करू,व प्रलंबित कामे मार्गी लावू अशी ग्वाही नूतन सरपंच प्रज्ञा वैद्य यांनी दिली.
प्रास्ताविक ,स्वागत व सुत्रसंचालन अमोल वैद्य यांनी केले तर आभार विलास वैद्य यांनी मानले.
यावेळी उपस्थित अधिकारी,मान्यवर व आजी- माजी पदाधिकारी यांचा ग्रा पं च्या वतीने सत्कार करण्यात आला.
पं. स.चे माजी उपसभापती संतोष देशमुख, सचिन वैद्य,ज्येष्ठ नागरिक दत्तू कोंडाजी वैद्य,सुगाव सोसायटी चे चेअरमन बाळासाहेब वैद्य,माजी चेअरमन महेंद्र वैद्य, डॉ.प्रविण वैद्य,ज्ञानेश्वर दूध संस्थेचे संचालक दयानंद वैद्य,दौलत वैद्य, विकास वैद्य, अंकुश वैद्य,दीपक वैद्य,नामदेव वैद्य,दादाभाऊ पवार, हौशीराम रोहम, शिवाजी वैद्य, प्रकाश पवार, संजय वैद्य, आण्णासाहेब वैद्य, दिलीप धराडे, डॉ राजेंद्र पवार, अरुण वैद्य,अर्जुन वैद्य,शिवराम सोनवणे, नामदेव बाळा वैद्य, टकू पवार, राजेंद्र त्रिभुवन, दत्तात्रय पवार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
Website Title: Latest news sarpanch sugav Khurd prdnya vaidya