संगमनेर तालुक्यातील चारही रुग्ण करोनामुक्त
संगमनेर: संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक गावातील एक व शहरातील तीन असे संगमनेरातील चार जणांना करोनाची लागण झाली होती. या सर्वांची करोना दुसरी तपासणी केली असता त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत अशी माहिती प्रांतधिकारी शशिकांत मंगरुळे आणि तहसीलदार अमोल निकम यांनी दिली. २० दिवसांनी हे रुग्ण करोनामुक्त झाले आहे.
करोनाचा संसर्ग झालेल्या दोन रुग्णांच्या संपर्कात संगमनेरातील १४ व तालुक्यातील एक असे १५ नागरिक आल्याने संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली होती. या१५ संशियीताना ताब्यात घेत त्यांना अहमदनगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आश्वी येथील एका जणालाही लागण झाल्याचे समोर आले होते. या व्यक्तीलाही जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले होते. या सर्वांची दुसऱ्यांदा करोना तपासणी करण्यात आली. रविवारी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयातून या चारही जणांना संगमनेर तालुक्यातील खासगी रुग्णालयात अलगीकरणासाठी दाखल करण्यात येणार आहे.
Website Title: Latest news Sangamner taluka Corona End