अकोले देवठाण रोड साईडपट्यांचे काम धोकादायक: अकोले न्यूजच्या बातमीने काम सुरु
संगमनेर अकोले न्यूजच्या वृत्ताने काम सुरु
अकोले: अकोले तालुक्यातील अकोले देवठाण रस्त्यावरील खोल गेलेल्या कडांच्या दुरुस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले आहे. मात्र हे काम नित्कृष्ट दर्जाचे व अयोग्य पद्धतीने उरकले जात असल्याचे दिसून येते.
प्रवाशांनी या कामाच्या दर्जाबाबत आपली कैफियत जेष्ठ पत्रकार प्रकाश टाकळकर यांच्याकडे मांडली. त्यांनी (पहा पुढील लिंकवरून) अकोले-देवठाण रस्त्यावरील साइडपट्टयांचे काम धोकादायक: अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष अशी बातमी संगमनेर अकोले न्यूजला पाठवून अकोले न्यूज या वृत्तपत्रात बातमी ३० सप्टेबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानंतर बांधकाम विभागाकडून रस्ता दुरुस्तीचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने नागरिकांच्या तक्रारीकडे डोळेझाक या रस्त्याचे काम उरकले होते. पावसाळ्यामध्ये या रस्त्याच्या कामातील भ्रष्टाचार उघड झाला आहे. रस्त्याच्या साईडपट्यांचे दुरुस्तीचे काम नागरिक व प्रवाशांच्या तक्रारींनंतर पुन्हा एकदा सुरु झाले आहे. संबधीत ठेकेदाराकडून मुरूम न टाकता ट्रक्टरच्या सहायाने रस्त्याच्या कडेला माती पसरवली जात आहे. पावसाने ती माती वाहून गेली असून पुन्हा खड्डे तयार झाले आहेत. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते हा रस्ता सिन्नर व संगमनेर तालुक्यांना जोडणारा आहे. रस्ता अरुंद असल्याने वाहनचालकांना वाहने जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागतात. विशेष करून दुचाकीस्वरांची अडचण होते. अनेकदा अपघात झाले आहेत. रस्त्याच्या नित्कृष्ट कामाची चौकशी करून संबधीतवर कारवाईची मागणी आढळा परिसरातून होत आहे. तक्रार करूनही ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकार्याबद्दल नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.
जाहिरात: साईनिवारा इस्टेट कन्सल्टंट अॅण्ड डेव्हलपर्स, संगमनेर
शेतजमीन, प्लॉट, बंगले, गाळा, गुंठेवारी इ. खरेदी विक्रीचे व्यवहार खात्रीशीर केले जातील. तसेच शेतीचे प्लॉट बिगर शेती (N.A.) केले जातील. गुंतवणुकीसाठी प्लॉट उपलब्ध. संपर्क: 9405404536
Website Title: Latest News Sangamner Akole news effect work start