Home संगमनेर संगमनेरातील करोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कातील १३ जणांना नगरला हलविले

संगमनेरातील करोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कातील १३ जणांना नगरला हलविले

संगमनेर: संगमनेर शहरातील घुलेवाडी राहणाऱ्या डॉक्टरच्या संपर्कातील तेरा जणांना नगर येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले असून त्यांच्या स्त्राव चाचणी अहवालाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.

घुलेवाडीत राहणाऱ्या डॉक्टरचा २७ मे रोजी करोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला होता.  त्यागोदर २४ मे रोजी त्यांनी आपल्या सासरवाडीत असलेल्या राजापुरात येऊन सासर्याचा पाहुणचार करताना पुण्यांसह अंबारसाचे जेवण घेतले. त्यामुळे त्यांच्यासोबत असणाऱ्या पाच जणांना संशयावरून ताब्यात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविले आहे.

त्याचबरोबर त्यांचे मुळचे गाव चिंचोली गुरव मध्ये डॉक्टरनी फेर फटका मारून गाठीभेटी घेतल्याचे समोर आले आहे. तेथील चारही जणांना डॉक्टरच्या कुटुंबातील दोघानाही जिल्हा रुग्णालयात पाठविले आहे.

संगमनेर शहरामधील मदिना नगर परिसरातील दोघे बुधवारी रात्री घुलेवाडीच्या ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आले असताना त्यांच्यातील लक्षणे संशयास्पद वाटल्याने त्यानाही नगरला पाठविण्यात आले. त्यामुळे एकाच दिवशी संगमनेर तालुक्यातून जिल्हा रुग्णालयात तेरा जणांना पाठविण्यात आले आहे. त्यांच्या घशातील स्त्राव तपासणी अहवालाकडे संपूर्ण तालुक्यासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

संगमनेर शहरात समूह संक्रमणाचे चित्र सुरु झाले आहे. आता तरी संगमनेर तालुक्यातील जनतेने जागरूक होऊन नियमांचे पालन केले पाहिजे. बाहेरगावाहून येणारे नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Website Title: Latest News Sangamner 13 people who were in contact with the doctor were shifted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here