Home अकोले राजूर गावचे भूमिपुत्र संदीप पवार यांना आदर्श गोपालक पुरस्कार प्रदान 

राजूर गावचे भूमिपुत्र संदीप पवार यांना आदर्श गोपालक पुरस्कार प्रदान 

राजूर: जिल्हा परिषद अहमदनगर कृषी विभाग व पशु संवर्धन अहमदनगर यांच्या वतीने सन 2018-19चा आदर्श गोपालक पुरस्कार अकोले तालुक्यातील राजुर गावाचे भूमिपुत्र  श्री. संदीप रमेश पवार यांना मालपाणी लॉन्स संगमनेर या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आद.बाळासाहेब थोरात  यांच्या हस्ते   प्रदान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. सुधीर तांबे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले,  उपाध्यक्ष प्रतापराव पा. शेळके, महिला व बालकल्याण सभापती सभापती अनुराधाताई नागवडे, कृषी व  पशु संवर्धन समितीचे सभापती अजय फटागरे, कैलासराव वाकचौरे, बीज माता राईबाई पोपेरे, सुनीताताई भांगरे,  जालिंदर वाकचौरे, रमेश देशमुख,  सिताराम राऊत,  धनंजय गाडे,  बाजीराव दराडे, सुषमाताई दराडे सोमनाथ पाचारणे,  शाम माळी,  रंजनाताई मेंगाळ,  सुनंदाताई जोर्वेकर,  आदी मान्यवर उपस्थित होते.
संदीप पवार यांना आदर्श गोपालक पुरस्कार प्राप्त झाल्याने राजूर गावातुन  तसेच प्रतिष्ठित मान्यवर यांच्याकडून अभिनंदन होत आहे. राजूरगावचे भूमीपुत्र असल्याने राजूर गावातील नागरिकांना त्यांचा अभिमान वाटत आहे.
Website Title: Latest News Sandeep Pawar, the landowner of Rajur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here