अकोलेत रोटरी क्लबच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबीर
अकोले प्रतिनिधी- येथील लाल-तारा मेडिकल अँड शॉपी व रोटरी क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने दि 30 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी 10 ते साय.4 या वेळेत मोफत आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती लाल ताराचे संचालक सचिन आवारी व रोटरी क्लब चे अध्यक्ष रो.सचिन शेटे,सचिव डॉ. रविंद्र डावरे यांनी दिली. लाल तारा मेडिकल शॉपी ही व्यवसायाच्या माध्यमातून ग्राहकांची सेवा करीत आहे तर रोटरी क्लब हा सामाजिक,आरोग्य,शैक्षणिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर आहे.
या आरोग्य सप्ताहात अनेक तज्ञ डॉक्टर्स उपस्थित राहणार आहे.दि 30 नोव्हेंबर रोजी हृदय रोग तज्ञ डॉ. राहुल शेवाळे,दि 1 डिसेंबर रोजी मधुमेह तज्ञ डॉ.अतुल आरोटे,दि 2 डिसेंबर रोजी स्त्री रोग तज्ञ डॉ कल्याणी आरोटे, दि 3 डिसेंबर रोजी मेंदू विकार तज्ञ डॉ मुकेश धांडे, दि 4 डिसेंबर रोजी पोट विकार तज्ञ डॉ अजिंक्य सोनांबेकर दि 5 डिसेंबर रोजी मूत्र विकार तज्ञ दि 6 डिसेंबर रोजी अस्थी रोग तज्ञ डॉ अमोल सानप व छाती रोग तज्ञ डॉ अजिंक्य म्हसे हे मोफत तपासणी करणार आहेत.रुग्णांनी आपल्या आजाराचे पुर्वीच्या दवाखान्यातील रिपोर्ट बरोबर आणवेत.तपासणी नंतर रुग्णाला शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास त्यावर नामवंत हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. नाव नोंदणीसाठी सचिन शेटे,(9960084707),डॉ रविंद्र डावरे(9970617281), सचिन आवारी(9763865583), सचिन देशमुख(9881939099),डॉ जयसिंग कानवडे (9822475099) यांचेशी सम्पर्क करावा.
या आरोग्य सप्ताह साठी यशलक्ष्मी महिला सेवा भावी संस्था,शताब्दी हॉस्पिटल,नाशिक, रोटरी क्लब व लाल तारा मेडिकल शॉपी यांचे सहकार्य लाभले आहे.तरी रुग्णांनी लाल तारा मेडिकल अँड शॉपी, बस स्टँड समोर अकोले येथे तपासणीसाठी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
Website Title: Latest News Rotary club health Checkup