अकोले: विलगीकरणात राहण्यास नकार, सहा जणांवर गुन्हा
कोतूळ: सहा जण दुसऱ्या राज्यातून व मुंबई येथून गावात आले ग्रामप्रशासनाने विलगीकरनाच्या सुचना देण्यात आल्या तरीदेखील गावभर फिरत आहे. अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथील विलगीकरण कक्षात न रहाणाऱ्या सहा जणाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या कारणावरून ग्रामसेवकांनी त्यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली आहे.
ब्राम्हणवाडा येथे कोविड संसर्गजन्य रोग नियंत्रणासाठी ब्राम्हणवाडा ग्रामपंचायत व येथील प्रशासनाने येथील विद्यालयात विलगीकरण कक्ष तयार केला आहे. गुजरात व मुंबई येथून गावात आलेले तना शौकत पटेल, प्रदीप भाऊ आरोटे, रेखा प्रदीप आरोटे, चांगुणा दत्तात्रय आरोटे, अशोक बारकू फलके, उज्जवला अशोक फलके यांना बाहेरून आल्यामुळे विलगीकरण कक्षात राहण्याची राहण्याची सूचना ग्रामप्रशासनाने दिली होती. हा आदेश डावलून ते सर्व लोकांमध्ये फिरत आहे.
वाचा: संगमनेरात एसआरपीएफ दाखल, २५० वाहने जप्त
याबाबत गावातील नागरिकांनी प्रशासानाकडे तक्रारी केल्या होत्या. यामुळे ग्रामविकास अधिकारी नागेश पाबळे यांच्या तक्रारीवरून अकोले पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, हेड कॉन्स्टेबल बन्सी टोपले यांनी भेट देऊन सहा जणाविरुद्ध कारवाई केली आहे.
Website Title: Latest News Refuse to stay in isolation Akole