अकोले: नागरिकत्व कायदा विरोधी राष्ट्र सेवा दलाच्यावतीने निषेध
अकोले: केंद्रातील सरकारने आणलेला नागरिकत्व सुधारणा कायदा हा संविधानाच्या मुल पायालाच छेद देणारा आहे. भारताच्या बहुभाषिक, बहुधार्मिक, भारतीय संस्कृतीच्या मुल तत्वांनाच हरताळ फासण्याचा हा प्रयत्न भारतीय जनता कधीच खपून घेणार नाही असा इशारा देत राष्ट्र सेवा दल अकोले केंद्राच्या वतीने प्रस्तावित कायद्याचा जाहीरर निषेध करण्यात आला आहे.
राष्ट्र सेवा दल कार्यकर्त्यांनी अकोले बस स्थानकाच्या परिसरात या कायद्याविरोधात निदर्शने केली. धर्माच्या आधारावर भारतीय नागरिकांमध्ये फुट पाडण्याचे भारतीय जनता पक्षाचे हे षड्यंत्र असून लोकसभेतील बहुमताच्या जोरावर भविष्यात एक देश, एक भाषा, एक धर्म,एक नेता या दिशेने सुरु असलेली वाटचाल हि देश विरोधी व संविधान विरोधी आहे.
विनय सावंत, डॉ. अजित नवले, नारायण एखंडे, लक्ष्मण आव्हाड, अमोल आरोटे, अनिल शेटे, सुभान शेख, कमुभाई मणियार, रोहित भोर यावेळी उपस्थित होते.
Website Title: Latest News Rashtra Seva Dal