Home अकोले राजूर येथील आरोग्य शिबिरात दोनशे रुग्णांची तपासणी

राजूर येथील आरोग्य शिबिरात दोनशे रुग्णांची तपासणी

राजूर:  ता.अकोले येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका कार्यवाह प्रमोद लहामगे यांचे स्वर्गीय पिताश्री मुरलीधर लहामगे यांच्या प्रथम स्मृतीदिना निमित्त आयोजित मोफत कँन्सर तपासणी उपचार व सर्वरोग निदान शिबिरात दोनशे रुग्णांनी तपासणी करून त्यांना मोफत औषधे पुरविण्यात आली.
या शिबिराचे आयोजन अकोले तालुका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,डॉ.बाबसाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचलित श्री गुरुजी रुग्णालय नाशिक व लहामगे परिवार राजूर यांच्या वतीने करण्यात आले होते.भारत माता प्रतिमा पूजन करून माजी अदिवाशी विकास मंत्री मधुकर पिचड यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. ग्रामीण भागात आश्या शिबिरांची गरज असून संघाच्या माध्यमातून रुग्ण सेवेचे होत असलेल्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले.
प्रारंभी कीर्तन सेवेच्या माध्यमातून ह.भ.प.भगीरत महाराज काळे यांनी मातृ पितृ ॠणाची महती विषद केली.या प्रसंगी ह.भ.प दीपक महाराज देशमुख,ह.भ.प.रामचंद्र महाराज गायकर, राजूरच्या सरपंच हेमलता पिचड,उप सरपंच गोकुळ कानकाटे, माजी सरपंच काशिनाथ भडांगे,गणपतराव देशमुख, पतित पावन संघटनेचे प्रांत अध्यक्ष प्रा.सोपानराव देशमुख,अगस्ती दुध संघाचे उपाध्यक्ष रावसाहेब वाकचौरे, ,रा.स्व.संघाचे जिल्हा संघ चालक भरत निमसे,जिल्हा कार्यवाह परिमल वेद,लव शिंदे,आबा मुळे,विक्रम गोंदकर,अशोकराव सराफ,सुभाष थमिरे,प्रा.दीपकजोंधळे,प्रदीप भाटे,बाळासाहेब मुळे,पत्रकार शांताराम काळे,सुनील ओहारा,बाबूलाल,ओहारा,डॉ.बाबसाहेब गोडगे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.रुग्णांची तपासणी डॉ.अमोघ काळे,डॉ.विक्रांत मुंगी,डॉ.गिरीश बेंद्रे व त्यांच्या सहकार्यांनी केली .यावेळी सुमारे पन्नास हजार रुपये किमतीची औषधे गरजू रुग्णांना मोफत देण्यात आली.
शिबीर यशस्वी करण्यासाठी अनिल,लहामगे,विनायकलहामगे,प्रमोद लहामगे,कल्पेश वऱ्हाडे,अशोक लहामगे, विक्रम जगदाळे,संतोष चांडोल,शरद बनसोडे,दर्शन ओहारा,यांच्या सह छत्रपती शिवाजी महाराज मित्र मंडळ यांनी प्रयत्न केले.
Website Title: Latest News Rajur patients examined at health camp

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here