राजूर गावची अवैध दारू बंद न झाल्यास लवकरच जनआंदोलन
राजूर प्रतिनिधी:- “राजूर गावची अवैध दारू बंद न झाल्यास लवकरच जनआंदोलन छेडण्यात येईल असे महिला वर्गाने इशारा दिला आहे.
अकोले तालुक्यातील राजूर परिसरातील राहुल नगर,इंदिरा नगर,चंदनवाडी येथील महिलावर्गाने राजूर पोलीस स्टेशनमध्ये राजूर परिसरात होणारी अवैध व चोरट्या मार्गाने होणारी दारू विक्री यांच्या विरुद्ध निवेदन देऊन जाहीर निषेध नोंदविला आहे.तर यावेळी काही महिलांनी राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांची भेट घेऊन त्यांना जाहीर रित्या निवेदन दिले.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, राजूर परिसरात २००५ साला पासून कायदेशीररित्या दारू बंदी केली असून पण ही दारू बंदी फक्त कागदावरच असून प्रत्यक्षरित्या ही अवैध व चोरट्या मार्गाने खुली असून ही दारू राजूर परिसरात डोकं वर करून जोमात होत असून याकडे स्थानिक गुन्हे शाखा यांनी डोळे झाक केल्यामुळे अनेकांची संसारे उघड्यावर अली आहे.आज मितीला अल्पवयीन मूल देखील दारूच्या आहारी गेलेली दिसून येत आहे.परिसरात अल्पवयीन मुलांनी देखील दारू विक्री केली असल्याची चर्चा सर्वत्र ऐकण्यास मिळत आहे.मग या अवैध दारू विक्रेत्यांना कुणाचे भय राहिले नाही.खुले आम ही दारू विक्री राजूर व परिसरात पार्सल स्वरूपात व ऑनलाइन पद्धतीने दिली व विक्री केली जात आहे.
लोक कायमच पोलिसांच्या नावाने खडी फोडत असतात पण पोलिसांनी नेमके कोणती कामे करायची राजूर परिसरात अनेक वेगळी प्रकरणे होत असतात.मग पोलिसांनी ती कामे करायची की अवैध दारू विक्रेत्यांचं माघे पळायचं मग ही कामे स्थानिक गुन्हे शाखेची असून त्यांच्याकडे लोक तक्रार का करत नाहीत असाही प्रश्न कायम सतावत असतो.
Website Title: Latest News Rajur Mass agitation