राजूर बस स्थानकात रोडरोमियोनचा उच्छाद तर टवाळ गावगुंडांनी मांडला हैदोस
राजूर प्रतिनिधी(ललित मुतडक) :- याविषयीचे सविस्तर वृत्त असे की,राजूर बस स्थानकात टवाळ खोर तसेच रोडरोमियोची मजल वाढत चालली असून हे दिवसेंदिवस टवाळ खोरी वाढत असून लवकरच मोठे कृत्य होण्याची शक्यता नाकारता येत नाही तर ही टवाळ खोर प्रशासनाला देखील घाबरनासे झाले आहे.अहमदनगर जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली राजूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली गेली दोन महिन्यांपासून संपूर्ण परिसरात होमगार्ड यांची गस्ती घातलेली आहे.त्यामुळे रोडरोमियो,अवैध धंदे हे बंद पडतांना दिसून येत आहे.पण एवढे करून पुन्हा हा उपक्रम सुरू होतांना दिसून येत आहे.
यावेळीचे चित्र काही वेगळेच दिसत आहे.बस स्थानक परिसरात दुचाकीवर ट्रिपल शीट मुले फिरकताना दिसून येत आहे.मग काय?मोठे कृत्य झाल्यानंतर प्रशासन यावर कार्यवाही करणार का असा प्रश्न सध्या परिसरात पडत आहे.मग तेरी भी चूप मेरी भी चूप असा प्रकार सध्या पहावयास मिळत आहे.
राजूर बस स्थानक परिसरात या आधी देखील भांडणे अल्पवयीन मुले बस स्थानकाच्या पाठीमागील बाजूला दारू पितांना आढळून आले होते. मुलींच्या टिंगल्या करणे त्यांना छेडणे असे प्रकार घडून गेले असून तरी ही अद्यापही परिसरात कठोर कारवाई करण्यात आली नाही. तर सध्या परिस्थिती ही वेगळी असून प्रशासनाने यावर लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करावी व पुन्हा एकदा परिसर स्वच्छ व मोकळा श्वास घेता येईल असा बनवावा.
राजूर गावातील काही तरुण युवक काही काम नसतांना कॉलेज व विद्यालय सुटल्यानंतर बस स्थानक परिसरात का येत असतात याचा अद्यापही शोध काही पोलीस यंत्रणेला लागलेला नाही मग हे मोठे आव्हान पोलीस प्रशासनासमोर उभे राहिले आहे.यावर लवकरात लवकर कार्यवाही करण्यात यावी.राजूर बस स्थानकात उगाच फिरणाऱ्या टवाळ खोरांची हजेरी दररोज लागत आहे.शाळा कॉलेज सुटल्यानंतर ही फेरी सुरू होते तर जो पर्यंत बस स्थानक तुटुंब भरलेले असते तो पर्यंत ही टवाळ खोर मूल परिसरात तक धरून बसलेली असतात.
Website Title: Latest News Rajur bus stand