अॅड. एम. एन. देशमुख कॉलेजच्या एन एस एस कडून गरीब मजुरांना किराणा, भाजीपाला आणि मास्क वाटप
अकोले: राजूर येथील अॅड.एम. एन. देशमुख महाविद्यालयाच्या एन एस एस युनिट ने कोल्हार – घोटी महामार्गाच्या आणि स्थानिक गरीब मजुरांना आणि किराणा, भाजीपाला व मास्कचे वाटप केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाबासाहेब देशमख यांनी यासाठी स्वखर्चाने किराणा व भाजीपाला घेऊन दिला, तर विद्यार्थ्यांनी घरी मास्क बनवले.
राजूर परिसरात कोल्हार – घोटी महामार्गा चे काम चालू असून कोरोनाच्य साथीमुळे त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे एन एस एस स्वयंसेवकांचे सर्व्हेतून लक्षात आले. तसेच कोरोनामुळे स्थानिक मजुरांना देखील रोजगार राहिलेला नसून मजूर कुटुंबाची स्थिती अत्यंत बिकट झाल्याचे सर्व्हेतून दिसून आले. ही गोष्ट लक्षात आल्यानंतर महाविद्यालयाचे एन एस एस कार्यक्रम अधिकारी प्रा. बबन पवार, स्वयंसेवक धनंजय मोहिते, अक्षय भडांगे, मुकुंद पवार, प्रशांत धादावड यांनी ही बाब प्राचार्यांच्या कानावर घातली. प्राचार्य डॉ. बाबासाहेब देशमख यांनी तातडीने पैशाची व्यवस्था करून या कुटुंबांना मदत करण्यास सांगितले. मदत वाटप करताना या गरीब कुटुंबाच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
महाविद्यालयाच्या एन एस एस युनिट ने केलेल्या कार्याचे कौतुक होत आहे. देशमुख महाविद्यालयाचा सामाजिक कामात नेहमीच पुढाकार असतो. त्यासाठी सत्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. एम. एन. देशमुख साहेब, सचिव मा. टी.एन.कानवडे सर, सह सचिव मिलिंद उमरानी, व्यवस्थापन अधिकारी प्रकाश महाले हे महाविद्यालयाच्या पाठीशी उभे राहतात. महाविद्यालयाच्या एन एस एस युनिट ला सावित्रीबार्इ फुले पुणे विद्यापीठाचे आदर्श युनिट, आदर्श कार्यक्रम अधिकारी असे पुरस्कार मिळालेले आहेत. ही परंपरा महाविद्यालयाने पुढे चालू ठेवलेली आहे.
Website Title: Latest News M N Deshmukh Student Social Work