संगमनेर शहरात मोठी कारवाई: ७० दुचाकी जप्त
संगमनेर: संगमनेर शहरात पोलिसांनी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी सुरु केली आहे. काल शहरात मोटारसायकलवर फिरणाऱ्या नागरिकांना अडवून पोलिसांनी ७० मोटारसायकल जप्त केल्या आहेत. १२ ते ३ या वेळेत मोकळीक असल्याने नागरिक विविध वस्तू आपल्या मोटारसायकलवर घेऊन जात होते. पोलिसांनी ही वाहने जप्त केल्याने या नागरिकांची मोठी गैरसोय झाली असून त्यांनी संताप व्यक्त केला.
मागील आठवड्यात दिल्ली नाका परिसरात एका दिवशी २०० मोटारसायकल जप्त केल्या होत्या. काल गुरुवारी सकाळी पोलीस निरीक्षक अभय पारमार, सहायक पोलीस निरीक्षक साबळे व त्याचे सहकारी पोलीस कर्मचारी यांनी संगमनेर बस स्थानक परिसरात सुमारे ७० मोटारसायकली जप्त केल्या. जप्त केलेली वाहने बसस्थानकासमोरील रिकाम्या जागेत लावण्यात आल्या आहेत. आता या मोटारसायकली केव्हा परत मिळतील या विवंचनेत मोटारसायकल चालक मालक आहेत.
शहरात लॉकडाऊन असतानाही मोटारसायकलआणण्यास मनाई आहे. मात्र तरीही अनेक नागरिक दुचाकीचा वापर करतात. काही हिंडफिरे अनावश्यक कारणासाठी फिरतात त्यामुळे त्यांच्यासोबत इतरानाही या कारवाईला सामोरे जावे लागते. यात ग्रामीण भागातील नागरिकांचा मोठा भरणा आहे.
Website Title: Latest News Lockdown Big action in Sangamner city