Latest News: कोतुळचा पूल वाहतुकीसाठी खुला
कोतूळ: अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड धरणातून १७० दशलक्ष घनफूट पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यामुळे कोतूळ पूल दहा महिन्यानंतर वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
ह्या वर्षी पावसाळा जास्त झाल्याने मुळा नदीवरील ६०० दशलक्ष घनफूट पाण्यापैकी मार्च महिन्यात २५० दशलक्ष घनफुट पाण्यापैकी सोमवारी उशिरा १७० दशलक्ष घनफूट पाणी बोरबनपर्यंत सोडण्यात आले सध्या धरणात फक्त १२० दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक आहे. असे जलसंपादाचे सहायक अभियंता नानासाहेब खर्डे यांनी मंगळवारी सांगितले.
मागील गेली दहा महिने पाण्याखाली असलेला पूल खुला करण्यात आला आहे. आता अकोले संगमनेर भाजीपाला वाहतुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु हे सुख कोतूळकरांसाठी काही महिन्यांपूरतेच आहे. जून महिन्यात मान्सून आल्याबरोबरच मुळा नदी वाहती झाली की, पुन्हा वाहतुकीसाठी बंद करण्यात येतो.
Website Title: Latest News Kotul bridge started