Home अकोले तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात हिवरगाव आंबरे शाळा यंदाही अव्वल

तालुकास्तरीय सांस्कृतिक कार्यक्रमात हिवरगाव आंबरे शाळा यंदाही अव्वल

अकोले:(प्रतिनिधीः- अंकुश  वाकचौरे):  दिनांक 24 डिसेंबर रोजी कळस येथे तालुका स्तरिय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत पार पडलेल्या तालुका स्तरिय स्पर्धेत हिवरगाव आंबरे शाळेने प्रथम क्रमांक पटकावला. या ठिकाणी तालुक्यातून विविध प्रकारच्या एकसे बढकर एक कार्यक्रम पाहण्यास मिळाले.
जिल्हा परिषद अहमदनगर दरवर्षी मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा कार्यक्रमाचे आयोजन करत असते.
यंदाही या स्पर्धेत लहान गटात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरगाव आंबरे शाळेने बाजी मारली. मागील वर्षी देखील याच शाळेने जिल्ह्यात प्रथम क्रमांक घेऊन तालुक्याचा मान वाढविला होता. आता देखील अशीच अपेक्षा आहे.  या कौतुकास्पद कामगिरीने सर्व स्तरातून शिक्षक व विद्यार्थी यांचे कौतुक होत आहे.
 या साठी  शिक्षक अस्मिता ठुबे, दया पारधी, बंडू वाकचौरे,  विजय आंबरे, रवी रुपवते यांनी विशेष परिश्रम घेतले.
 या कामगिरीबद्दल जालिंदर वाकचौरे(जि.प.अहमदनगर)  संत आंबरे(सदस्य पंचायत समिती) अरविंद कुमावत(गटशिक्षणाधिकारी) तसेच राजेश पावसे, जालिंदर खताळ, बाळासाहेब दोरगे,शंकर गाडेकर(शि.वि.अधिकारी)अशोक ढगे, सुनील रेवगडे(अध्यक्ष शा.समिती) ज्ञानेश्वर वाकचौरे (उपाध्यक्ष शा समिती )शालेय व्यवस्थापन समिती सर्व सदस्य  तसेच अमोल ठुबे, शिवनाथ कदम, अवि, कोळगे, माधव ठुबे, अरुण नाईकवाडी, जना अण्णा आंबरे ,  गणेश आंबरे, प्रदीप उगले तसेचआम्ही हिवरगाव  करटीमने व सर्व ग्रामस्थांनी पुढील प्रवासासाठी सदिच्छा दिल्या आहेत.
Website Title: Latest News Hivargaon Ambre School tops

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here