Home अकोले लिंगदेव येथे शेतीच्या वादातून शिक्षकाची दमदाटी करून चुलत्यांना त्रास

लिंगदेव येथे शेतीच्या वादातून शिक्षकाची दमदाटी करून चुलत्यांना त्रास

अकोले: लिंगदेव येथील शेतकरी मंजुळा शिवराम फापाळे ,बाबाजी शिवराम फापाळे यांना प्राथमिक शिक्षक ज्ञानदेव महादू फापाळे ,महादू शिवराम फापाळे, यमुनाबाई महादू फापाळे यांनी अश्लील शिवीगाळ करून सामायिक जागेत राहणे मुश्किल केले आहे .प्राथमिक शिक्षकांच्या  सांगण्यावरून वडील दारू पिऊन भाऊ बाबाजी व मंजुळ यांच्या कुटुंबाला कायम त्रास देत आहे .

शिक्षक हे सुशिक्षित असुन तरी देखील वडिलांना व आईला पूढे करून तो मागे राहून दोन्ही चुलत्याना कायम त्रास देत आहे परवा दुपारी सदर शिक्षक यांनी घरी येऊन तुम्ही घराबाहेर चालते व्हा असे दोन्ही चुलत्याना दमदाटी केली तुम्हाला काय करायचे आहे ते करून घ्या मी त्याला समर्थ आहे शिक्षकांच्या आईने अश्लील शिवीगाळ केली.

वाचा: संगमनेरात एसआरपीएफ दाखल, २५० वाहने जप्त

अज्ञान पणाचा फायदा घेऊन सदर प्राथमिक शिक्षकाने आपल्या वडिलांच्या नावावर जास्त जमीन करून घेतली व भावाना खडकाळ जमीन दिली सदर भावानी ती खडकाळ जमीन डेव्हलप केल्यानंतर त्या जमिनीवर कब्जा करण्याचा प्रयत्न सदर शिक्षक करण्याचा प्रयत्न करत आहे व वाटप झालेली जागाही त्यांना देत नाही असा आरोप सदर शिक्षकांचे चुलते करत आहे .या अन्यायाविरोधात बाबाजी शिवराम फापाळे व हरिभाऊ मंजुळ फापाळे यांनी ज्ञानदेव महादू फापाळे, महादू शिवराम फापाळे, यमुनाबाई महादु फापाळे यांच्या विरोधात अकोले पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वी 504,506 प्रमाणे तक्रार दाखल केली आहे. याचा तपास  पोलीस कॉन्स्टेबल टोपले हे करत आहे .

Website Title: Latest News Harassment of cousins crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here