भंडारदरा परिसरात जोरदार वादळी वाऱ्यासह गारांचा पाउस
भंडारदरा(News): मंगळवार दिनांक ५ मे संध्याकाळी भंडारदरा परिसरात सुमारे एक तास वादळी वाऱ्यासह जोरदार पाउस झाला. या पावसात गारा देखील पडल्या.
मंगळवारी सायंकाळी पावणे सहा वाजेपासून ते साडे सात वाजेपर्यंत वादळी वाऱ्यासह गारांचा पाउस पडल्यामुळे नागरिकांची अचानक धांदल उडाली होती. घरकुल योजनेअंतर्गत अनेक घरकुलांचे कामे अपूर्ण आहेत. राज्यात लॉकडाऊन असल्यामुळे घरकुलाचे पत्रे, सिमेंट, विटा इतर सामान मिळत नसल्यामुळे अनेक घरांची कामे खोळंबलेली आहेत. ही कामे अर्धवट असल्यामुळे घरांचे पत्रे व साहित्य उडून गेली. या वादळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली.
Website Title: Latest News Hail with strong winds in Bhandardara area