राजूर: वीज बिल थकल्यामुळे पाणीपुरवठा योजनेची वीज खंडित
राजूर: वीज बिल थकल्यामुळे महावितरण कंपनीने येथील ग्रामपंचायत नळ पाणीपुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा खंडित केला या महिना अखेरीपर्यंत योजनेची एकूण थकबाकी सुमारे सव्वा दोन कोटीहून अधिक झाली आहे.
राजूर नळ पाणीपुरवठा योजनेसाठी निळवंडे जलाशयाजवळ उच्चदाबवाहिनीद्वारे विद्युत पुरवठा केला जातो तर पाणी वितरीत करणाऱ्या टाकिजवळ स्वतंत्र वाहिनीद्वारे वीजपुरवठा केला जात आहे. गेल्या काही वर्षापासून राजूर ग्रामपंचायतवर पाणी पुरवठा योजनेचा थकीत वीज बिलाची टांगती तलवार कायम आहे. दोन हजार सोळामध्ये वीजबिलाची थकबाकी सुमारे दीड कोटी रुपये इतकी होती त्यावेळी एकूण बिलाच्या ५० टक्के रक्कम भरल्यानंतर उर्वरित रक्कम सुट दिली जाणार होती. त्यावेळी ग्रामपंचायतीने ४९ हजार रुपयांचा भरणा केला होता. मात्र पुढे हा लाभ मिळाला नसल्याचे उप सरपंच गोकुळ कनकाटे यांनी सांगितले.
थकीत वीज बिलात वाढ होत होती आजपर्यंत २ कोटी २८ लाख रुपये झाली. यात चालू वीज बिल भरल्यानंतर पाणी पुरवठा खंडित होत नव्हता यावेळी चालू वीज बिल ग्रामपंचायतीने भरले नाही याबाबत महावितरण कंपनीने १० दिवसापूर्वी वीज बिल भरण्याबाबत नोटीस बजावली होती मात्र कार्यवाही न झाल्याने शुक्रवारी ह्या योजनेचा वीज पुरवठा कंपनीने खंडित ग्रामपंचायतकडून केला गेला. आजपर्यंत २ कोटी २८ लाख रुपये झाली या चालू वीज बिल पाणीपुरवठा खंडित होत नव्हता. यावेळी चालू वीज बिल ग्रामपंचायतीने भरले नाही. असे सहायक एस.के. राउत यांनी सांगितले.
Website Title: Latest News electricity disconnected of water supply