Home अकोले विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार ही  ग्रहण करावेत: सुनील राउत

विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच संस्कार ही  ग्रहण करावेत: सुनील राउत

अकोले:  विद्यार्थ्यांनी जीवनात यशस्वी होण्यासाठी संस्कार व सुसंगत महत्वाचे असून विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होताना शिक्षणाबरोबर संस्कार हि ग्रहण करावेत व आदर्श नागरिक बनावे असे आवाहन महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता सुनील राउत यांनी केले.

महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या वतीने आयोजित भगवान विश्वकर्मा जयंती निमित्त अकोल्यातील वनवासी कल्याण आश्रमातील विध्यार्ध्यासाठी आयोजित वार्तालाप व मिष्टान्न स्नेहभोजन  कार्यक्रमात ते बोलत होते.वीज वितरण कंपनीत काम करीत असताना कर्मचारी यांनी हि कर्तव्या परी निष्टा ठेऊन काम करावे. वीज कामगार महासंघाने विश्वकर्मा जयंती निमित्त विध्यार्ध्यासाठी भोजन देऊन सामाजिक बांधिलकी जपली याचेही त्यांनी कौतुक केले. अध्यक्षपदी महावितरणचे सहाय्यक अभियंता शशिकांत शिंदे तर प्रमुख पाहुणे म्हणून माँडर्न विध्यालायाचे उप प्राचार्य  मधुकर साबळे होते.

या वेळी प्रा.दीपक राउत यांनी विध्यार्ध्यांशी संवाद साधून अभ्यासा बाबत त्यांना सखोल मार्गदर्शन केले.या वेळी वीज कामगार महासंघाचे पदाधिकारी अमोल आभाळे,संतोष देशमुख,वसंत आभाळे,बाळासाहेब गोडे,यांच्यासह वनवासी कल्याण आश्रमाचे पदाधिकारी रजनी टेके, रामदास सोनवणे,वैजनाथ येनगेवार,किशोर टेके,माजुश्री राउत,उपस्थित होते.आश्रमाचे अधीक्षक मधुकर चोथवे यांनीसूत्र संचलन,आभार प्रदीप भाटे यांनी मानले.या वेळी वीज कामगार महासंघाच्या वतीने वनवासी कल्याण आश्रमाचे वयोवृद्ध पूर्ण कालीन कार्यकर्ते चंद्रभान टेके यांचा सुनील राउत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

Website Title: Latest News education, the cultures should be accepted

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here