अकोले तालुक्यात डेंगू आजाराचे थैमान अडीचशे रुग्णांना लागण
अकोले : अकोले शहर व परिसरात डेंगू आजाराने थैमान घातले असून गेल्या तीन आठवड्यात सुमारे २५० रुग्णांना त्यांची लागण झाली आहे. याबाबत तालुका आरोग्य विभाग, ग्रामीण रुग्णालय व नगरपंचायतीकडून आवश्यक त्या प्रतिबंधक योजना वेळीच व पाहिजे त्या वेगाने ना आल्याने या रुग्णांमध्ये वाद होत आहे. यासाठी कराव्या लागणाऱ्या रक्त तपासणीसाठी हि मनात येईल ती फी आकारली जात असून गरीब रुग्ण मेटाकुटीला आहे.
अकोल्याच्या शेकईवाडी परिसरात तर गेल्या दोन दिवसांत ११ रुग्ण आढळले असून नगरपंचायतीला वारंवार सांगूनही सत्कारात व पुरस्कार मिळविण्यात मग्न असलेल्या नगरपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांना नागरिकांच्या मागणीकडे लक्ष द्यायला वेळ नाही. याबाबत दोन दिवसांत आवश्यक उपाययोजना न झाल्यास शेकइ वाडी ग्रामस्थांनी बेमुदत आंदोलनाचा इशारा दिला आहे.
याबाबत अकोल्याचे माजी सरपंच जयराम गायकवाड व शेकईवाडी येथील ग्रामस्थांनी याबाबतचे निवेदन नगराध्यक्ष व मुख्याधिकारींना दिले आहेत.
Website Title: Latest News Dengue outbreak in Akole