अकोले तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा: ग्राहक पंचायत
अकोले: तालुक्यात गेल्या ४ ते ५ महिन्यापासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. हाता तोंडाशी आलेली पिके सडून चालले तर जी आहे त्याचा काही उपयोग नाही. यामुळे आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे, म्हणून तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोले च्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा अकोलेचे अध्यक्ष दत्ता शेणकर, सचिव दत्ता रत्नपारखी जिल्हा उपाध्यक्ष एम. मंडलिक, जिल्हा सचिव रमेश राक्षे, सखाहरी पांडे, मीनानाथ पांडे,आदी उमेदवारांनी आज मा.तहसीलदार अकोले यांना निवेदन दिले.
निवेदनात म्हंटले आहे की, तालुक्याच्या दक्षिण व उत्तर भागात कांदा, मका, बाजरीसह भाजीपाला तर पश्चिमेस असलेल्या आदिवासी पट्ट्यात देखील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील बहुतांश शेतकरी हा निरक्षर असल्याने ते पिक विम्याबाबत जागरूक नसतात. त्यामुळे हे नैसर्गिक आपत्ती समजून शासनाने तातडीने पंचनामे व पिक विम्याबाबत असलेल्या अटी व शर्ती शिथिल करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा असे आवाहन देखील ग्राहक पंचायतच्या वतीने करण्यात आले आहे.
Website Title: Latest News declare drought in Akole taluka