अकोलेतील नोकरीच्या आमिषाने ७४ युवकांची फसवणूक: लाखो रुपयांना गंडा
अकोले: सिक्युरिटी कंपनीत कामाला लावतो म्हणून तालुक्यातील कळस बुद्रुक येथील ७४ तरुणांना सुमारे सात लाख रुपयांना गंडा घालण्यात आला. याप्रकरणी पुणे येथील दाम्पत्याविरुद्ध अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
याबाबत अकोले पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नितीन महाजन याने बालाजी कंपनीत ७४ तरुणानाची सिक्युरिटी साठी निवड केली. प्रत्येकाला ड्रेससाठी ३२४० रुपये याप्रमाणे २ लाख ३९ हजार ७६० रुपये रक्कम व संजय जाधव यांना सुपरवयाझर पदासाठी २५ हजार रुपये आशालता महाजन हिने क्लार्क पदासाठी भरती करून देते यासाठी तिने १८ लोकांकडून २५ हजार रुपये याप्रमाणे एकूण ४ लाख ३३ हजार रुपये असे एकूण सहा लाख ७२ हजार जमा करून ते नितीन विजय महाजन यांना अहमदनगर जिल्हा बँक अकोले शाखा व स्टेट बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राद्वारे रोख दिले. याप्रकरणी कळस बुद्रुक येथील संजय विश्वनाथ जाधव यांनी पोलिसांत तक्रार दिली. यावरून अकोले पोलिसांनी कात्रज पुणे येथील नितीन विजय महाजन व आशालता नितीन महाजन यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Website Title: Latest news crime-fraud in job