अकोले तालुक्यात शेततळ्यात बुडून चुलते पुतण्याचा मृत्यू
अकोले: तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे वडगाव रोड शिवारात शेततळ्यात चुलता पुतणे बुडून मृत्यू झाला आहे. कार्तिक सुनील गोर्डे आणि अनिल खंडू गोर्डे असे या मृत झालेल्याची नावे आहेत.
पिंपळगाव निपाणी वडगाव लांडगा रोडवर रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भीमाशंकर गोर्डे यांच्या शेततळ्यात कार्तिक गोर्डे पोहण्यासाठी गेला असता तो पाण्यात बुडाला त्याला वाचविण्यासाठी चुलते अनिल गोर्डे यांनीदेखील पाण्यात उडी मारली. मात्र शेततळ्यांच्या प्लास्टिक कागदामुळे त्यानाही बाहेर येता आले नाही. या दोघांचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. घरातील लोकांनी शेततळे फोडून त्यांना बाहेर काढले.
वाचा: संगमनेर नाशिक पुणे हायवेवर दुचाकीस्वारास अपघात जागीच ठार
Website Title: Latest News Cousin drowned in a farm in Akole taluka