संचारबंदीत फिरणे नगरसेवकाला पडले महागात, गाडी जप्त, गुन्हा दाखल
श्रीरामपूर: शहरात संचारबंदी असताना मोकाट फिरणाऱ्या २५ नागरिकांना चांगलेच महागात पडले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नगरसेवक राजेंद्र पवार यांचीही पोलिसांनी गाडी जप्त करत त्यांच्यासह २५ व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेचा फलक लावून फिरणे नगरसेवक राजेंद्र पवार यांना चांगलेच महागात पडले आहे.
श्रीरामपूर पोलिसांनी सोमवारी धडक मोहीम हाती घेत संचारबंदीचे नियम मोडणारया व अत्यावश्यक सेवेचे फलक लावणारे कायदा मोडणाऱ्यावर चांगलाच जरब बसविला आहे.
पोलिसांच्या या कारवाईत राष्ट्रवादीचे नगरसेवक राजेंद्र पवार सुद्धा सुटू शकले नाही. त्यांच्या कारला अत्यावश्यक सेवेचा फलक लावण्यात आला होता. फलक लावून शहरात फिरणाऱ्या नगरसेवकाच्या गाडी जप्त करण्यात आली त्याचंबरोबर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान जिल्हाधिकारी यांनी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक संचारबंदीच्या काळात शहरात फिरण्यास बंदी होती अशी माहिती लोकमतला दिली होती. विनाकारण रस्त्यावर फिरू नये. अत्यावश्यक कामासाठी प्रशासनाला सुचना द्याव्यात. तरीदेखील शहरात नगरसेवक फिरताना दिसत आहे. या कारवाईमुळे राजकीय कार्यकर्ते, पदाधिकारी यांना चांगलाच चोप बसणार आहे.
Website Title: Latest News Councilor fell into expensive mode