मुंबईची पाहुनी घेऊन आली करोनाचा वानोळा, कुटुंब कोरांटाईन
अहमदनगर: केडगावात माहेरवासिनेने आणला करोना. मुंबईतून २८ वर्षीय महिला केडगावात माहेरी आली होती. तिने मुंबईतून आणला करोनाचा वानोळा. या महिलेचे पहिले दोन अहवाल निगेटिव्ह आले मात्र तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे महिलेच्या कुटुंबाला कोरांटाईन करण्यात आले आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, मुंबई येथे नोकरीला असणारी एक महिला २२ मे रोजी केडगाव येथे माहेरी आली होती. शेजारी असलेल्या लोकांनी तिला पाहिल्यावर प्रशासनास सांगितले. त्यानंतर प्रशासनाने त्या महिलेस जिल्हा रुग्णालयात कोरांटाईन केले. त्या काळात महिलेचे दोनदा स्त्राव तपासणी करण्यात आली मात्र तिचे अहवाल निगेटिव्ह आले. तिसरा अहवाल पॉझिटिव्ह आला. ही महिला गर्भवती असल्याची माहिती प्रशासन विभागाने दिली. मुंबई पुणे येथून काही लोक गुपचूप वास्तव्य करतात मात्र या महिलेची खबर स्थानिकाने दिल्याने या महिलेस कोरांटाईन करण्यात आले. या महिलेच्या कुटुंबातील व्यक्तींना कोरांटाईन करण्यात आले आहे.
Website Title: Latest News Corona’s Vanola came with a guest