अकोले तालुक्यात चौथा करोना रूग्ण सापडल्याने खळबळ
अकोले: अकोले तालुक्यात चौथा रूग्ण सापडल्याने प्रशासनाची आता धावपळ उडाली आहे. अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील घाटकोपर मुंबईवरून आलेली 68 वर्षीय महिला पिंपळगाव खाड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत तिला कोरोनटाईन करण्यात आली होती. दोन दिवसापासून तिची तब्येत अचानक खालावल्याने तिची तपासणी करण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडून आलेल्या अहवालानुसार ती पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
त्यामुळे अकोले तालुक्यात कोरोणाचा हा चौथा रुग्ण आढळल्याने गेल्या दोन महिन्यापासून प्रशासनाने राबवलेली मोहीम बाहेरून आलेल्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोणाचा अभाव मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे अजूनही अकोले तालुक्यात मुंबई-पुणे-नाशिक यासह अनेक भागातून नागरीक ये जा करताना दिसत आहे , तर राजुर भाग पाच दिवसांसाठी पुन्हा एकदा लाॅक डाऊन करण्यात आला आहे.
राजूरचे पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील व रात्री ग्रामपंचायतचे सरपंच गणपतराव देशमुख यांनी प्रथम पासूनच या गावांमध्ये करडी नजर ठेवून स्वतः गावांमध्ये व पंचक्रोशीत करून बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर करत नजर ठेवल्याने आदिवासी भागांमध्ये अजूनही कोणाचा रुग्ण आढळून आला नाही व त्या दृष्टीने या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी करण्यात आल्यामुळे व पोलीस यंत्रणेचे व दक्षता समितीचे असलेले लक्ष यामुळे या भागात कोरूना बाधित रुग्ण अद्यापही दिसून आला नाही वरच्या भागातील असलेले नियोजन भविष्य काळात आदिवासी भागाला तारू शकते मात्र महाराष्ट्र राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसुबाई पायथ्याजवळ नाशिक मुंबई या दोन जिल्ह्यांच्या आद्य असून या ठिकाणी पोलिस यंत्रणा कार्यालय दिसून येत नाही त्यामुळे या भागातील मोठी मुंबई येथून वाहतूक होत असल्याची चर्चा सुरू आहे.
पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात अबाधित रुग्णांची संख्या वाढू शकते अजूनही वेळ गेलेली नाही तरी बारी याठिकाणी तातडीने चेक करून सुरू करावी. अकोल्याचे लोकप्रतिनिधी आमदार किरण लहामटे यांनी अनेक वेळा चेक ग्रुपवर करडी नजर ठेवण्याचे आदेश संबंधित विभागाला दिल्या गेल्या आहेत. चेक पोस्टवर असणारे शिक्षक व शासकीय कर्मचारी यांना पोलीस यंत्रणेचा हातभार लागत आहे.
अकोले तालुक्यात करोनाचा चौथा रुग्ण असल्याने नागरिकांमध्ये वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाकडून सतर्क राहण्याचे, काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Website Title: Latest News Corona Akole Taluka fourth patient