अकोले: राष्ट्रवादीच्या घड्याळाचे काटे पिचडाच्या कमळाला रुतणार का?
अकोले: माजी मंत्री व राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते मधुकर पिचड आणि नुकताच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केलेले वैभव पिचड यांना राजकीय खिंडीत गाठण्यासाठी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी व्युव्हरचनेची आखणी केली आहे.
त्यासाठी वैभव पिचड यांच्या विरोधात विधानसभा निवडणुकीत भाजप विरोधी अन्य सर्व राजकीय पक्ष व संघटनांच्या वतीने एकच उमेदवार उभा करण्याची तयारी चालवली आहे. याचाच एक भाग म्हणून नेते आमदार अजित पवार विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे खासदार अमोल कोल्हे मंगळवारी १७ सप्टेंबर अकोल्यात येत आहे यांच्या प्रमुख उपस्थिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कार्य करता मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात शिवसेना भाजपा कॉंग्रेस मनसे व अन्य राजकीय पक्षातील काही पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्ते हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत अकोले मतदार संघातून पिचड यांच्या विरोधात निवडणूक लढविण्याची इच्छा असलेले अन्य राजकीय पक्षातील सर्व नेत्यांना अजित पवार यांनी एकत्रित केले आहे. या सर्वांचा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात मंगळवारी जाहीर प्रवेश होणार असल्याचे समजते.
त्यामुळे आगामी निवडणुकीत अकोल्यात वैभव पिचड यांच्या विरोधात सर्व पक्षीय परंतु राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा उमेदवार उभा करून कमळ विरुद्ध घड्याळ अशीच निवडणूक करण्याचा पवार यांचा निर्णय झाला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके व जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांनी अकोल्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसची पुनर्बांधणी करण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केले आहे.
Website Title: Latest News BJP and NCP Opposition