अकोले तालुक्यात एकास हेल्मेटने मारहाण, गुन्हा दाखल
अकोले: करोना पेशंटच्या संपर्कात आलो आहे अशी बदनामी का करतो असे विचारल्याचा राग आल्याने हेल्मेट डोक्यात मारून जखमी केल्याची घटना सुगाव येथे घडली आहे.
याबाबत अकोले पोलिसांत सुरेश पुंजाजी शिंदे यांनी फिर्याद दिली असून यात म्हंटले आहे फिर्यादी शिंदे यांनी स्वतः आरोपी भाऊसाहेब निवृत्ती तळेकर यांचे सुगाब येथील घराजवळ जाऊन विचारले की, तू माझ्याबद्दल ढोकरी येथील करोना पेशंटच्या मी संपर्कात आलो आहे असे का मी तर त्या पेशंटला ओळखत नाही त्याचा माझा काय संबंध नाही, तु माझी बदनामी का करतोस असे म्हंटला असता याचा राग घेऊन भाऊसाहेब तळेकर याने शिवीगाळ दमदाटी करून त्याच्या डोक्यातील हेल्मेट काढून माझ्या डोक्यात मारून दुखापत केली आहे. या फिर्यादीवरून अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.ना. कोरडे हे करीत आहे.
Website Title: Latest News beaten with a helmet in Akole taluka