अकोले तालुक्यात लॉकडाऊन नियम उल्लंघन प्रकरणी दोघांजणांवर गुन्हे
अकोले: राज्यात सर्वत्र लॉकडाऊन आहे. करोना विषाणूचाचा प्रादुर्भाव नष्ट करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यात सगळीकडे निर्बंध घातले आहे. तरीदेखील अकोले तालुक्यातील किराणा मालाचे व्यापारी तथा धनंजय सुपर शॉपी यांचे मालक राहुल विलास कराळे यांच्यावर लॉकडाऊन चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच भारत एजन्सीमधील किराणा मालाचे व्यापारी मोहसीन हमीद तांबोळी यांच्यावरसुद्धा लॉकडाऊन नियम उल्लंघन प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फक्त जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा ठराविक वेळेत नागरिकांना पुरविला जात आहे. त्याला देखील काही नियम व अटी ठरवून दिलेल्या आहेत. या अटींचे उल्लंघन करणाऱ्यावर कडक कारवाई केली जाणार आहे हे वारंवार जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी स्पष्ट केले आहे तरीदेखील तालुक्यातील काही जण या नियमांचे उल्लंघन करताना दिसत आहे. असे जर कोणी नियमांचे उल्लंघन करणार असेल तर त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार आहे.
Website Title: Latest News Akole two-person crime register