अहमदनगर: १२ अहवाल निगेटिव्ह, ३७ अहवाल प्रतीक्षेत, अकोलेतील निगेटिव्ह
अहमदनगर: अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या वतीने पुणे येथील लष्करी वैद्यकीय महाविद्यालाकडे पाठविलेल्या अहवालपैकी १२ अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर उर्वरित ३७ अहवालांची प्रतीक्षा असल्याचे आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे.
शनिवार दिनांक २ मी रोजी पाथर्डी तालुक्यातील मोहोजदेवढे येथील एक करोनाबाधित आढळून आला होता. त्याचबरोबर १२ अहवाल शनिवारी रात्री उशिरा प्राप्त झाले. तसेच पाथर्डी तालुक्यातील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कातील ३७ व्यक्तींच्या घशाचे स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे.हे अहवाल अजून प्रतीक्षेत आहेत.
दरम्यान अकोले तालुक्यातील नाशिक येथील रहिवासी पोलीस व पत्नीच्या नातेवाइकांच्या संपर्कातील तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे अकोलेकरानी सुटकेचा श्वास टाकला आहे. अकोले तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभिरे यांनी आवाहन केले आहे की, चारही संशियीतांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. घाबरून जाऊ नये तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.
Website Title: Latest News Akole taluka corona report negative