अकोले : विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाने त्यांना प्रेरणा मिळते: आमदार डाॅ. सुधीर तांबे
अकोले : विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाने त्यांना प्रेरणा मिळते त्यांचा सत्कार हा त्यांना पुढील आयुष्यासाठी फायदेशीर असून हे काम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ करत असून त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. असे प्रतिपादन पदवीधर मतदारसंघचे आमदार डाॅ. सुधीर तांबे यांनी केले.
अकोले येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी गौरव व पुरस्कार वितरण सोहळ्यात डाॅ. तांबे बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पत्रकार संघाचे राज्य कार्याध्यक्ष वसंतराव मुंढे होते कोकण विभागाचे अध्यक्ष भगवान चंदे,राज्यप्रसिध्दी प्रमुख नवनाथ जाधव, जिल्हा परिषद सदस्य डाॅ. किरण लहामटे, अकोले एज्युकेशन सोसायटीचे सचिव यशवंतराव आभाळे, उपसभापती मारुती मेंगाळ, दिलीप शाह, एम.एम. भवारी, पत्रकार बीड जिल्हा अध्यक्ष वैभव स्वामी, ठाणे जिल्हा सचिव नरेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष पंडित म्हसने, प्रकाश टाकळकर, अमोल वैद्य, अल्ताप शेख, प्राचार्य संतोष कचरे, मनोहर हिंगणे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील धुमाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी डाॅ. तांबे म्हणाले, लोकशाहीची गाडी रुळावर आणण्याचे काम पत्रकार
करतात. ग्रामीण भागातील पत्रकारांचे योगदानही महत्वाचे असून हे पत्रकार विद्यार्थ्यांच्या विशेष गुणांची दखल घेतात आणि त्यांचा सत्कार करतात हे
कौतुकास्पद असून संघाने दिलेले पुरस्कारार्थींचे योगदानही समाजासाठी मोठे असल्याचा उल्लेख त्यांनी केला.
वसंत मुंडे यांनी गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा राज्यभर साजरा होतो. समाजातील चांगले व्यक्तीचा गौरव केलेने त्यांना प्रोत्साहन मीळते असे सांगितले
यावेळी प्रा. बी.एम. महाले (शैक्षणिक), राजेंद्र उकिरडे (पत्रकारिता व शैक्षणिक), नंदाताई लोहरे (सामाजिक), संजय महानोर (पत्रकारिता),
भास्करराव नवले (कृषी) यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. जिल्हा परिषद इंदोरी पदमावती नगर शाळेच्या वतीने विश्वास आरोटे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे सचिव विश्वासराव आरोटे यांनी तालुक्यातील एक लाख विद्यार्थ्यां पर्यत शैक्षणिक साहित्य पोहोचवत असल्याचा उल्लेख करत पत्रकार संघाच्या वतीने
वह्या, पेन, दप्तर, छत्री आदी सुविधा पुरवित असल्याचे सांगत या उपक्रमाचे हे सतरावे वर्ष असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषद सदस्य डाॅ. किरण लहामटे यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. स्वागत अशोक उगले यांनी केले सुत्रसंचालन अनिल राहणे, दत्ता जाधव यांनी केले.आभार भाऊसाहेब वाकचौरे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्याचंद्र सातपुते, अण्णासाहेब चौधरी, हेमंत आवारी, नितीन शहा, संतोष साळवे, हरीभाऊ आवारी, राम भांगरे, जगन्नाथ आहेर, गणेश रेवगडे, अशोक शेळके , सचीन खरात, निलेश वाकचौरे, प्रविण धुमाळ, दत्ता हासे, निखिल भांगरे, रमेश देशमुख, राजा राठोड, ललित मुतडक, शुभम फापाळे, सुनील आरोटे, भाऊसाहेब साळवे यांनी प्रयत्न केले.
Website Title: latest News Akole Sudhir Tambe Pratipadan