अकोलेत शिवभोजन थाळी उद्यापासून सुरू: तहसीलदार मुकेश कांबळे
अकोले: कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर अकोले तालुक्यातील जनतेला सर्व सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनावर आहे तालुक्यातील सर्व अतिशय चांगले काम आहे त्यामुळे एकही रुग्ण तालुक्यात नाही. आशासेविका, गटप्रवर्तक, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी यांचेसाठी मास्क व सॅनिटाझर आपण देणार आहोत असे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी सांगितले
अकोले तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत खासदार लोखंडे बोलत होते. यावेळी तहसीलदार मुकेश कांबळे, पोलीस निरीक्षक अरविंद जोंधळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत गंभीरे, डॉ संजय घोगरे, नगरपंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन पटेल आदींसह शिवसेना तालुका अध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, भाजप सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे, नगराध्यक्षा संगीता शेटे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे, नगरसेवक प्रमोद मंडलीक, सुरेश लोखंडे, गणेश कानवडे खासदारांचे स्वीय सहाय्यक शिवाजी दिशागत आदी उपस्थित होते.
अकोले तालुक्यातील सर्वांना चांगले आरोग्य सुविधा व अन्नधान्य मिळाले पाहिजे तसेच खरोखरच गरीब व्यक्ती वंचित राहिले नाही पाहिजे. विना रेशनकार्ड धारकांना सुध्दा मदत मिळाली पाहिजे किराणा दुकानदार यांनी चढ्याभावाने माल विकू नये अन्यथा त्यांच्यावर कारवाई करावी असेही आदेश खासदार लोखंडे यांनी दिले
खासदार लोखंडे यांनी विचारलेले प्रश्नाला उत्तरे देताना अधिकारी यांनी पुढील माहिती दिली. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या संकल्पनेतून शिवभोजन थाळी उद्यापासून सुरू होत असून सुरवातीला ७५ थाळी उपलब्ध होणार असून गरीब व्यक्तीनी त्याचा फायदा घ्यावा तसेच एप्रिल महिन्याचे रेशन वाटप झाले असून नंतर मोफत रेशनवाटप होणार असून नंतर मे,जून चे वाटप होईल. शिवाय सामाजिक संस्था मार्फत गरिबांना किराणा वाटप केले जातात. इतर भागातील कामगारांसाठी मवेशी व अगस्ती विद्यालयात व्यवस्था करण्यात आली आहे अशी माहिती तहसीलदार मुकेश कांबळे यांनी सांगितले. अकोले तालुक्यातील ग्रामपंचायत च्या वतीने ४५० कुटुंबातील दिव्यांग व्यक्तींना १५ दिवसाचा किराणा वाटप करण्यात आलेअसून तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत नी फवारणी केली असून चौदाव्या वित्त आयोगाच्या व्याजातून आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, यांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे यांनी दिली. अकोले तालुक्यातील सर्व आरोग्य अधिकारी दक्ष असून दहा उपकेंद्र आहेत. २२ परदेशी नागरिकांनची कोरोना टेस्ट केली असून ती निगेटिव्ह आहे तसेच १७हजार इतर गावाहून आलेले व्यक्ती वर नियंत्रण ठेवले असून त्यांना १४ दिवस पूर्ण झाले आहे अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात एक्स रे, रक्त लघवी युनिट चालू आहेत अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ इंद्रजीत गंभीरे व डॉ संजय घोगरे यांनी दिले. अकोले नगरपंचायत चे वतीने सर्व सफाई कामगारांना मास्क चे वाटप करण्यात आले आहे असे मुख्य अधिकारी डॉ सचिन पटेल यांनी सांगितले.
शिर्डी मतदारसंघात संगमनेर व राहता तालुका वगळता कोरोना प्रादुर्भाव नाही तरीही जिल्ह्यातील कारखानदारांनी सभासदाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहून शेतकऱ्यांना सर्व मदत करावी. खा. लोखंडे
Website Title: Latest News Akole shivbhojan thali