अकोले: नाभिक समाजाच्या विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन
अकोले: तालुक्यातील नाभिक संघटनेच्या वतीने दहावी व बारावीत उत्तीर्ण झालेल्या नाभिक समाजाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २० जुलै रोजी दुपारी १ वाजता करण्यात आले असल्याची माहिती नाभिक संघटनेचे अध्यक्ष किरण चौधरी यांनी दिली..
याबाबत प्रसिद्धीपत्रकात चौधरी यांनी म्हटले की, संघटनेच्या वतीने या गौरव सोहळ्याचे आयोजन दरवर्षी केले जाते. गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात येते. यावर्षी आ. वैभवराव पिचड, नाभिक समाजाचे राज्याध्यक्ष दत्ता अनारसे, जिल्हाध्यक्ष किरण बिडवे, जि. प. अर्थ व बांधकाम सभापती कैलासराव वाकचौरे, पं. स. सदस्य दत्तात्रय बोऱ्हाडे, कळसच्या सरपंच योगिता वाकचौरे, उपसरपंच दिलीप ढगे, कळसच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे, व्यसनमुक्ती केंद्राचे प्रमुख डॉ. गौराम बिडवे, नोटरी अॅड. बी. जी. वैद्य, विष्णू महाराज वाकचौरे, गुरव समाजाचे जिल्हाध्यक्ष अशोक पांडे, राजू गवांदे, नामदेव निसाळ, ताराचंद सुरसे, संजय जगताप, दशरथ तुपे, बाबासाहेब जाधव, रमेश सस्कर, संजय बिडवे, भीमराज हुडे, मनोज वाघ, दिलीप जाधव, योगेश शिंदे, राहुल बिडवे, संजय जायभाई, अनिल सस्कर, तात्या बिडवे, अंगद बिडवे, संजय बिडवे, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष सचिन शिंदे, सोन्याबापू वाकचौरे, ईश्वर वाकचौरे, सागर वाकचौरे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे..
गुणवंत विद्यार्थ्यांनी आपले संपूर्ण नाव, मार्कशिटची झेरॉक्स व मोबाइल क्रमांक दोन दिवसात बाळासाहेब मदने, अमोल कोल्हाळ, योगेश बोऱ्हाडे, अजित बोऱ्हाडे, दत्तात्रय चौधरी, मंगेश चौधरी, रमेश वाघ, माधव कोल्हाळ, भाऊसाहेब पंडित, साहेबराव पंडित, उत्तम शिंदे, बाळासाहेब शिंदे, विलास तुपे, विनायत पंडित, सुरेश काळे, तुकाराम काळे, गोपीनाथ बिडवे, वसंत रायकर यांच्याकडे जमा करावेत, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Website Title: Latest News Akole: Organizing Nabhiik Samaj’s Student Pratishth Gaushala