मऊसूत पुरणपोळी, त्यावर गावरान तुपाची धार: प्रा. डी .के. वैद्य
अकोले : प्रा डी के वैद्य :-मऊसूत पुरणपोळी,त्यावर गावरान तुपाची धार. जोडीला राळ्याचा शिरा, तांदळाची खीर अशी पंचपक्वान्नांची लांबलचक यादी…… शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे….. फूड महोत्सवात झालेले मवेशी (तालुका अकोले ) रान भाज्या खाद्यपदार्थांचे कालचे प्रदर्शन मवेशी गावाला देशाच्या नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पर्यंत घेऊन गेले.
‘रानचा मेवा, चवीने खावा’ ‘राष्ट्रीय पोषण मिशन । करू या कुपोषण निर्मूलन ।।’ हा अजेंडा डोळ्यापुढे ठेवून आणि या ध्येय व घोषवाक्याचे परिपूर्ण पालन करण्याचे धोरण डोळ्यापुढे ठेवून भारत सरकारच्या आदिवासी जनजाति मंत्रालय व अभिमत प्रवरा अभिमत विद्यापीठाच्या पुढाकाराने काल हे रानभाज्या महोत्सव व खाद्यपदार्थ मेळाव्याचे आयोजन केले गेले होते तिथे हे घडलेले सुखद असे दर्शन.
या महोत्सवाला ग्रामीण खाद्यसंस्कृतीचा बाज जसा होता.तशी त्याला शहरीकरणाची किनारही लाभली होती. शाकाहारी खाद्यपदार्थांच्या बरोबरच मांसाहारी पदार्थांच्या स्टॉलनाही व चवीच्या खाणाऱ्या व्यक्तींनी केलेली गर्दी बोलकी ठरली.
त्या शेजारी स्टॉल होते ते अपरिचित रानभाज्या, कुंपण भाज्या व विस्मरणात चाललेल्या खाद्यपदार्थांचा येथील प्रदर्शनात सहभागी झालेल्या शहरी बाबूंबरोबर जिल्ह्यातील अनेक भोजन प्रेमींनी आस्वाद अवीट गोडीचा आस्वाद घेतला.
या मेळ्यात ज्वारी, बाजरी, नागली,यांची भाकरी,परोटे, हुलगे,चवळी,मूग हरभरा आदींची उसळ,तांदूळ प्रकारात हातसडी, इंद्रायणी,हातसडी-१००८, खुशबू (दप्तरी), आंबेमोहर,ढउळ साळ,काळ भात,रायभोग या विस्मरणात चाललेल्या नावांचा आणि त्यांच्या पदार्थांचा प्रदर्शनाचा खऱ्या अर्थाने आस्वाद उपस्थितांनी घेतला.
त्याला जोडीला क्रॅब फ्राय,मच्छी फ्राय, फिश फ्राय आणि जोडीला पपईची चटणी, म्हणजेच ‘रानचा मेवा । तुम्ही खावा’ हे घोषवाक्य येथे परिपूर्ण परिचय देऊन गेले.म्हणजे येथील शैक्षणिक संकुलाने हा पाहिलेला खऱ्या अर्थाने एक ऐतिहासिक प्रसंग होता.
येथे काय होते ? या प्रश्नापेक्षा येथे काय नव्हते? हा खरा मोठा भाग राहिला.डांगराची भाजी,डांगराचे कोवळे देठ,कच्ची पपई, हादग्याची फुले, तेलबियाचे चार पाच प्रकार, शिवाय खुरसणी, पान भाजी, अंबाडीची भाजी या सर्वांच्या जोडीला सुद्धा होते. एक वैशिष्ट्यपूर्ण असा या खाद्यपदार्थाचा भाग येथे होता.
या जोडीला कोरफड, कोकम, आवळा यांचे ज्यूस, जोडीला पुरणपोळी,वांग्याचे भरीत आणि या पाक कौशल्याचे सादरीकरण करणारे धीट पणे आणि अस्खलितपणे डेमो देणारे ग्रामीण आदिवासी भागातील मुले एक वेगळ्या विश्वात सर्व सहभागी व पाहुण्यांना नेऊन ठेवत होते.हेही या प्रदर्शनाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य ठरले.
विविध चटण्या, करवंदाचे लोणचे,सॅलड, आदिवासींच्या विविध रंगी खाद्य पदार्थांचे आणि त्यांनी स्वतः बनवलेल्या कौशल्याचे या खाद्यसंस्कृती मध्ये निश्चित पणाने आस्वादाचे दर्शन देऊन गेले. विविध प्रकारच्या थालीपीठ पासून किंवा तांदळाच्या,वरई,नागली पासून
बनवलेल्या इडल्या आणि त्याला जोडीला असलेले रूचकर असे शेवगामिश्रित सांबर हे या प्रदर्शनाचे निश्चितपणे वेगळे वैशिष्ट्य ठरले.
या प्रदर्शनामध्ये आदिवासी विभाग दिल्लीचे सचिव डॉक्टर दीपक खांडेकर, आदिवासी विकास विभागाच्या राज्याच्या प्रधान सचिव डॉक्टर मनीषा वर्मा, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे प्रभारी कुलपती डॉक्टर राजेंद्र विखे, त्याचबरोबर उपस्थित असणारे सर्व मीडियाचे प्रतिनिधी या सर्वांनी या सर्व खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला. आणि हा प्रसंग ऐतिहासिक बनवला हेही निश्चित पणे नमूद करण्यासारखे हे प्रदर्शन राहिले.
आदीनाथ सुतार, मेघना खेडकर, देविदास राजगिरे, पी जी गायकवाड या शिक्षकांच्या खेरीज योगेश पवार, सायली वाघमारे या विद्यार्थ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतलेले परिश्रम पथदर्शक ठरणार आहेत हे नक्की.
Website Title: Latest News Akole Maveshi ran meva