नाशिकसह अकोलेला पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान
अकोले: ६२ व्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत नाशिकच्या हर्षवर्धन सदगीर याने लातूरचा मल्ल शैलेश शेळके याचा पराभव करत महाराष्ट्र केसरी स्पर्धेत आपले नाव कोरले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील व सध्या नाशिक जिल्ह्यातील हरसूल महाविद्यालयाचा विद्यार्थी हर्षवर्धन सदगीरने महाराष्ट्र केसरी किताब आपल्या नावे केल्याने नाशिक व अकोले तालुक्यात जल्लोष बघायला मिळाला आहे. हर्षवर्धनला मानाची चांदीची गदा देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
हर्षवर्धनने शैलेश याचा ३-२ या फरकाने नमविले आहे. दोघेही एकाच तालमीत असल्याने शैलेशने आपल्या मित्राची खांद्यावर बसवून मिरवणूक काढली.
या अंतिम सामन्याकडे सर्वांच्याच नजरा होत्या. अखेर हर्षवर्धन सदगीर याने शैलेश शेळके याचा परभव करत हा केसरी किताबाचा मान मिळविला आहे व आपल्या नावे इतिहास रचला आहे. नाशिकसह अकोलेला पहिला महाराष्ट्र केसरी होण्याचा मान मिळाला आहे.
Website Title: Latest News Akole honor to be the first Maharashtra Kesari