अकोले: दोन मोटारसायकलची अज्ञात चोरट्यांकडून चोरी
अकोले (प्रतिनिधी): अकोले तालुक्यातील कळस येथे अज्ञात चोरट्यांनी दोन मोटारसायकल चोरून नेल्याची घटना घडली आहे. या मोटार सायकल चोरून नेल्यामुळं कळस परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.
राहुल वाकचौरे यांची बजाज पल्सर 220 ही गाडी नंबर MH 17 CB 1717 व संदेश लाड यांची यामाहा आर 15 ही नवीन विनानंबरची गाडी चोरीला गेली आहे. या गाड्या रात्री दोन वाजेच्या सुमारास चोरीला गेल्या आहेत. कळस येथे कोल्हार घोटी राजमार्गावर गावच्या जवळ असणारे हरिश्चंद्र वाकचौरे यांचे बंगल्याचे तार कंपाउंड तोडून दोन स्पोर्ट बाईक भारी किमतीच्या चोरून नेल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Website Title: Latest News Akole Bike theft