Home अकोले अकोले : भंडारदरा धरण ९० टक्के भरले

अकोले : भंडारदरा धरण ९० टक्के भरले

भंडारदरा : मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर पुन्हा वाढला. रतनवाडी येथे सात इंच पावसाची नोंद झाली. यामुळे धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता भंडारदरा धरणात बारा तासांत ४१० दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली. यामुळे शनिवारी सकाळपर्यंत भंडारदरा ९० टक्के भरण्याची शक्यता आहे.

 शुक्रवारी दिवसभरात भंडारदरा येथे ६१ मिमी पावसाची नोंद झाली. पडत असलेल्या पावसाचा नोंद झाली. पडत असलेल्या पावसाचा व धरणात येत असलेल्या नवीन पाण्याचा विचार करता शनिवारी सकाळी हा साठा ९० टक्यांपर्यंत पोहचणार आहे. दरम्यान निळवंडे धरणातील पाणीसाठाही शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता ५० टक्क्याहून अधिक झाला होता. दरम्यान गेल्या दहा दिवसांपासून  धरणांच्या पाणलोटात पावसाबरोबर वारेही असल्याने वातावरणत गारठा निर्माण झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.

.मागील आठवड्यापासून आदिवसी भागात उसंत न घेता पाऊस बरसत आहे. सह्याद्रीच्या गिरीशिखराहून फेसाळत पडणारे धबधबे आणि दुथडी भरून वाहणारे ओढे, नाले यामुळे सर्व परिसरात जलमय झाला आहे. भात खाचरे तुडुंब भरून वाहत आहेत. पावसाबरोबर वाहणारे वारे यामुळे परिसर गारठून गेला आहे. सततच्या पासवामुळे येथील जनजीवनावर आता परिणाम होऊ लागाला आहे. शुक्रवारी दिवसभराच्या बारा तासांत भंडारदरा येथे ६१ मीमी पावसाची नोंद झाली.

मुळा खोऱ्यातील हरिश्चंद्रगड परिसरातही दिवसभर पावसाचा जोर कायम होता. त्यामुळे या खोऱ्यातील सर्व छोटे मोठे धरणे ओसांडून वाहत आहेत. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता मुळेचा कोतूळ येथील विसर्ग १५ हजार ७७६ क्युसेक इतका होता. पावसाचा जोर असाच राहिल्यास यावर्षीही १५ ऑगस्टपूर्वी भंडारदरा धरण भरणार आहे. शुक्रवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत रतनवाडी -१७७, घाटघर – ८९ वाकी-७२, भंडारदरा- ७५, पांजरे – ५७

Website Title: Latest News Akole: Bhandardara Dam Is Filled With 90 Percen

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here