अकोल्यात करोनाबाधित रुग्णाने स्वतःचा गळा चिरून केली आत्महत्या
अकोला(जिल्हा): करोना संशियीत म्हणून अकोला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केलेल्या एका रुग्णान आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास स्वतःचा गळा चिरून आत्महत्या केली. या घटनेने खळबळ उडाली आहे.
मोहम्मद जहरूल इस्लाम वय ३० या तरुणाने आत्महत्या केली आहे. तो मूळ रहिवासी आसामच्या नागाव जिल्ह्यातील सालपाडा येथील आहे. करोना संशियीत असल्याने ७ एप्रिलला रुगणालयात दाखल करण्यात आले होते. नंतर पुढे त्याची तपासणी करण्यात आली. शुक्रवारी प्राप्त झालेल्या अहवालात हा करोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्याने आलेल्या नैराश्यातून हे पाउल उचलले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
आज पहाटे मोहम्मद जहरूल इस्लाम रक्तबंबाळ अवस्थेत बाथरूममध्ये आढळून आला. येथील कर्मचारी यांनी प्रशासनाला दिली. याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहे.
Website Title: Latest News Akola patient chops off his throat to commit suicide