जलसिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवारांना क्लीन चीट
नागपूर: माजी उपुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पूर्णपणे क्लीन चीट दिली.
सुमारे 70 हजार कोटी रुपयांच्या तथाकथित जलसिंचन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करीत असणाऱ्या एसीबी ने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. या आधीच एसीबी ने या घोटाळ्याशी संबंधीत नऊ प्रकरणांची फाईल बंद केली होती व आता एसीबी ने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करत या सर्व प्रकरणात अजित पवार यांचा काहीही संबध नसल्याचा दावा केला आहे. महासंचालकानीच क्लीन चीट दिल्यामुळे त्यांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान माजी मुख्यमंत्री यांनी प्रतिज्ञापत्र दिशाभूल करणारे आहे असे स्पष्ट केले आहे. याप्रकरणी हस्तक्षेप याचिका दाखल करणार असल्याचेही म्हंटले आहे.
अजित पवार विदर्भातील कोट्यावधी रुपयांच्या सिंचन घोटाळ्यासाठी जबाबदार नाही. या घोटाळ्याचा पारदर्शीपणे तपास केला जात असल्याचा स्पष्ट करून तपास संस्था बदलण्याची कोणतीही गरज नाही असे शपथपत्रात म्हंटले आहे.
Website Title: Latest News Ajit Pawar cleans cheat for irrigation scam