Home अकोले अहमदनगर जिल्ह्यातील १४ जण करोनामुक्त, अकोले दोन, संगमनेर तीन

अहमदनगर जिल्ह्यातील १४ जण करोनामुक्त, अकोले दोन, संगमनेर तीन

अहमदनगर: जिल्ह्यातील १४ व्यक्ती शनिवारी करोनामुक्त झाल्या आहेत. त्यामध्ये राहता तालुक्यातील पाच, अकोले तालुक्यातील दोन, संगमनेर तालुक्यातील तीन, पारनेर, शेवगाव, राहुरी आणि कर्जत तालुक्यातील प्रत्येकी एक असे १४ व्यक्ती करोनामुक्त झाल्या आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत १९ जण बरे होऊन घरी परतले आहे.

जिल्हातील करोनाच्या रुग्णांची संख्या २०७ झाली असून १०९ जणांना घरी सोडण्यात आले आहे. ८७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

संगमनेर येथील दोन व्यक्तींचा तसेच कोपरगाव येथील डॉक्टर महिलेचा खासगी प्रयोग शाळेतील अहवाल पॉझिटिव्ह आला होता. या अहवालांची नोंद आरसीएमआरच्या पोर्टलवर घेण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील तीन करोना रुग्णाची भर पडली आहे.

नगर जिल्ह्यातील रुग्णांचा आकडा जरी दोनशे पार झाला असला तरी बरे होऊन घरी गेलेल्या व्यक्तींचा आकडा शंभरी पार झालेला आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेली दहा दिवसांपासून करोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्याचबरोबर करोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. एकंदरीत हे वृत्त जिल्ह्यासाठी दिलासादायक ठरत आहे.

Website Title: Latest News Ahmednagar Sangamner Akole corona free

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here