अहमदनगर जिल्ह्यात तब्बल साडे नऊ हजार जणांवर गुन्हे
अहमदनगर: विनाकारण रस्त्यावर फिरणे, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचे पालन न करणे, मास्क न लावणे दुकाने वेळेत न लावणे, बेकायदा दारू विकणे हाणामारी असे प्रकारे गेल्या दीड महिन्यात जिल्ह्यात नऊ हजार गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
तब्बल सव्वा सात हजार नागरिकांवर नगर शहरातील कोतवाली आणि तोफखाना पोलीस स्टेशनला गुन्हे नोंद करण्यात आली आहेत. जरी गुन्हे नोंदाविलेलेले असले तरी अजून कायदेशीर कारवाई केली गेली नाही. करोनाची साथ संपल्यावर कायदेशीर प्रक्रिया केली जाणार आहे. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन व पोलीस यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत.
वाचा: बियरचा टेम्पो पलटी
गेल्या दहा दिवसांपासून गुन्हे नोंदविण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गुन्हे दाखल झालेल्या नागरिकांना अटक झालेली नाही. मात्र भविष्यात या मागरीकाना हेलपाटे मारावे लागणार आहे. पोलिसांना मारहाण, आरोग्य विभाग, नगरपालिका कर्मचारी यांच्या बरोबर उद्धत वर्तन, मारहाण असे प्रकार घडले आहेत. पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी ३ व इतर चार, सरकारी कामात अडथळे सात यांच्यावर गुन्हे दाखल केले आहे. यांना तत्काळ अटक करून न्यायालयात हजर केले आहे. त्यामुळे या आरोपींना पोलीस कोठडीत जावे लागले आहे.
वाचा: संगमनेरमध्ये ४ जामखेडचे करोना बाधितांना सुट्टी, आता उरले केवळ
Website Title: Latest News Ahmednagar District crime registered