अकोलेतील आरोपी जेरबंद: अल्पवयीन मुलीवर केला होता अत्याचार
राजूर: घाटघर येथील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणातील फरार आरोपीला अखेर दोन वर्षांनी राजूर पोलिसांनी सापळा रचून मंगळवारी रात्री ताब्यात घेतले आहे. भगवान पंढरीनाथ जगनर असे या आरोपीचे नाव आहे.
घाटघर येथील अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरणातील भगवान जगनर हा आरोपी दोन वर्षापासून फरार होता. हा आरोपी वारंवार पोलिसांना चकमा देत होता. मागील दोन वर्षापासून पोलीस त्याच्या शोधात होते. अखेर राजूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी आपल्या कर्मचार्यांसह सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले आहे. घाटघर येथील त्याच्या राहत्या घरातून पहाटे पाच वाजता ताब्यात घेतले. सापळा रचून पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन पाटील व त्यांच्या सहकार्यांनी परिश्रम घेतले.
Website Title: Latest News Accused arrested in Akole