हरिश्चंद्रगडावरील कोकणकडा मोहिमेत प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघाती मृत्यू
अकोले (प्रतिनिधी ):- हरिश्चंद्रगडावरील कोकणकड्यावरील मोहिमेत प्रसिद्ध गिर्यारोहक अरुण सावंत यांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
काल दिनांक १८ जानेवारी शनिवारी रोजी कोकणकडाच्या या मोहिमेत ३० जण सहभागी झाले होते. सावंत हे मोहिमेचे प्रमुख होते. सावंत यांच्यासह ३० गिर्यारोहक कोकण कड्यावर रॅपलिंगसाठी आले होते. ते या मोहिमेचे नेतृत्व करत होते. शनिवारी संध्याकाळपासून ते बेपत्ता झाले होते. रॅपलिंगचा पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आला होता. इतर २९ जण हे टप्पा उतरूनही आले होते. सावंत हे दोराच्या साह्यानं रॅपलिंग करत असताना, बेपत्ता झाले. तेव्हापासून त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. स्थानिक आणि इतर ट्रेकर्सच्या मदतीनं शोध घेण्यात येत होता.
रोप फिक्सिंग करताना अपघात झाला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यांचा मृतदेह सापडला असून, दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अरुण सावंत हे ट्रेकिंग क्षेत्रातलं मोठं नाव होतं. त्यांच्या अंदाजे तीन दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी ‘सह्याद्री’मधील नव्या वाटा शोधल्या होत्या.
कोकण कड्याची उंची ही साधारण अठराशे फूट आहे. सावंत जिथून बेपत्ता झाले, ती उंची अंदाजे हजार फूट होती. त्यांच्यासोबत असलेल्या इतर गिर्यारोहक सुखरूप आहेत. मात्र, सावंत यांच्याशी संपर्क होऊ शकला नव्हता. आज शोधमोहिमेदरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला आहे, तो दरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Website Title: Latest News Accidental death of arrestor Arun Sawant