Home अकोले अकोलेत आदिवासींच्या घरकुल योजनेत दीड कोटींचा अपहार

अकोलेत आदिवासींच्या घरकुल योजनेत दीड कोटींचा अपहार

अकोले: सन २००८ ते २०१२ दरम्यान आदिवासी प्रकल्पाच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या घरकुल योजनेत तत्कालीन प्रकल्प अधिकारी व घरकुल बांधकामाचा ज्या संस्थेला ठेका देण्यात आला होता. त्या संस्थेचे पदाधिकारी यांनी सुमारे दीड कोटी रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, २००८ ते २०१२ च्या काळात आदिवासी विभाग राजूर आदिवासी प्रकल्प अंतर्गत घरकुल बांधकामाचा ठेका देण्यात आला होता. यावेळी बांधकामात अनियामतता व घरकुल बांधकाम पूर्ण  न होताच सदर ठेकेदार संस्थेला निविदा प्रक्रियाचा अवलंब न करीता, शासकीय योजनेची अंमलबजावणी न करता त्या नावे आलेल्या रकमेचा स्वतःच्या फायद्याकरिता दुरुपयोग करून १ कोटी ३४ लाख ४५ हजार रुपयांचा अपहार करून शासनाची फसवणूक केली आहे. सदर तक्रारीच्या चौकशीसाठी शासनाने समिती नेमलेली होती. या समितीनेही सदर घरकुल योजनेत अपहार करून आरोपी यांनी संगनमताने शासकीय पदाचा दुरुपयोग केला असल्याचा अहवाल दिला असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजूर प्रकल्प अंतर्गत घरकुल योजनेत अपहार होऊन १ कोटी ३4 लाख ४५ हजार रुपयांची शासनाची फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Website Title: Latest News abduction in tribal housing scheme 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here